Amol Khatal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Khatal Shraddhanjali Post : ‘आता शांत बसणार नाही’; श्रद्धांजलीच्या पोस्टवर अमोल खताळांचा संताप

Amol Khatal warns of legal action over a viral condolence post and questions police action : संगमनेरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना धार; बदनामीमागे कोण आहे, शोध घेतल्याचा आमदारांचा दावा, कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा

Pradeep Pendhare

Sangamner politics : एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ हे चांगलेच संतापले आहेत. लोकप्रतिनिधीविरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या मुद्यावरून त्यांनी हा संताप केला आहे.

आता मात्र मी शांत बसणार नाही. या प्रकारामागे कोण आहे, याचा शोधही घेतला आहे, असे सांगत आमदार अमोल खताळ यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

आमदार खताळ यांनी यावरून पत्रकार परिषद घेत, "मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत शांत आहे. मात्र, संगमनेरचे (Sangamner) राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आता मात्र मी शांत बसणार नाही. या प्रकारामागे कोण आहे, याचा शोधही घेतला आहे," असे म्हटले आहे.

आमदार खताळ म्हणाले, "लोकप्रतिनिधीविरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकली जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पराभव जिव्हारी लागल्यामुळेच हे उद्योग सुरू असल्याचे दिसते. संबंधित व्यक्तीशी माझे कोणतेही संबंध नाहीत. त्याच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. हा प्रकार मी आमदार (MLA) होण्यापूर्वीचा आहे; मात्र मी आमदार झाल्यानंतरच तो उकरून काढण्यात आला आहे. मला कोणालाही एक रुपया देणे नाही आणि कोणाकडून एक रुपया घेणेही नाही. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीयदृष्ट्या कोण-कोण आहे, याचाही मी शोध घेतला आहे."

संबंधित व्यक्तीच्या हालचालींबाबत पोलिसांना माहिती असताना त्याच्यावर योग्य वेळी कारवाई का झाली नाही? माझे खांडगाव येथे जाणे पोलिस प्रशासनाला माहिती होते, तरीही संबंधित व्यक्तीला ताब्यात का घेतले नाही? पोलिसांची गोपनीय शाखा नेमके काय करत आहे, याची चौकशी झाली पाहिजे. संबंधित व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे दूरध्वनी संपर्क तपशील तपासावेत. संबंधित व्यक्तीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना आमदार खताळांनी पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सातत्याने मला लक्ष्य केले जात आहे. या प्रकारामागे कोण आहे, हे मी शोधून काढले आहे. संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. माझे कार्यकर्तेही माझ्यासाठी सक्षम आहेत; मात्र मी कायद्याच्या मार्गानेच पुढे जाणार आहे, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT