Amsha Padvi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amsha Padvi News : "आमशा पाडवींनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली..."

North Maharashtra Political News : विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर स्थानिक कार्यकर्ते संतप्त...

Sampat Devgire

Nandurbar News : 'शिवसेना ठाकरे गटाने आमशा पाडवी यांनी विधान परिषद सदस्य केले. या संदर्भात पाडवी यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. कोणतीही कुवत व पक्षासाठी काहीही काम न केलेल्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला, असे करून त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी आज आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी अक्कलकुवा तालुक्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार शरद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

माजी आमदार पाटील म्हणाले, 'शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सदैव सामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. आमश्या पाडवी हे देखील अतिशय अल्पशिक्षित व आदिवासी भागातील कार्यकर्ते होते. आदिवासी समाजाला पद व प्रतिष्ठा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषद सदस्य केले. त्याचे पाडवी यांनी काय पांग फेडले? असे विचारण्याची खेदजनक स्थिती आज निर्माण झाली आहे."

पाटील पुढे म्हणाले, "पद मिळाल्यानंतर आमश्या पाडवी यांनी पक्षासाठी व पक्ष विस्तारासाठी काम करणे अपेक्षित होते. मात्र तसे होऊ शकले नाही. स्थानिक कार्यकर्ते देखील त्यांच्यापासून अलिप्तच होते. आमश्या पाडवी यांच्या कामाची पद्धत वेगळीच होती. त्याबाबत स्थानिक प्रशासन अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात अतिशय नकारात्मक बोलले जात होते. अशा स्थितीत पक्षप्रमुख ठाकरे यांनी पाडवी यांच्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाला पात्र ठरणे आमश्या पाडवी यांचे कर्तव्य होते. मात्र तसे झाले नाही. याचा सर्वच कार्यकर्त्यांना खेळत आहे."

पाडवी यांच्या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे आज बैठक झाली. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबरच एकनिष्ठ राहण्याचे जाहीर केले. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी करण्याच्या निश्चय यावेळी करण्यात आला.

संख्याबळाचे राजकारण -

दरम्यान आमश्या पाडवी यांना शिंदे गटात प्रवेश देऊ नये, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबत नंदुरबारच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावर या तक्रारी टाकल्या होत्या. मात्र विधान परिषदेतील शिंदे गटाचे संख्याबळ वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्थानिक नेत्यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी या विषयावर आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT