Shiv Sena Sandesh Karle  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : कट्टर शिवसैनिक संधीच्या शोधात; 'वस्तादा'ची घेतली भेट, पुढं काय होणार...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कट्टर शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाविषयी या दोघांमध्ये काय खलबतं झाली, याची उत्सुकता आहे.

'राज्यातील प्रत्येक जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून विचार होत असून, योग्यवेळी योग्य निर्णय होतील, तुम्ही फक्त काम करा', अशा सूचना शरद पवार यांनी या भेटीत संदेश कार्ले यांना दिल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संदेश कार्ले पारनेर-नगर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहे. यासाठी ते राजकीय फिल्डिंग लावत आहेत. पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेत, भावना व्यक्त केली.

'शरद पवार (Sharad Pawar) यांनी संदेश कार्ले यांच्या धाडसाचं कौतुक केले. राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या जागेचा विचार महाविकास आघाडी म्हणून होत आहे. तुम्ही फक्त काम करत राहा, सत्तेत बसायचे आहे. सगळी कामे नियोजनाने मार्गी लावली जात आहे. सत्ता आणू, नंतर सर्व काही पाहू', अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितले.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने तसे संकेत दिले आहे. परंतु एकाच घरात दोन पदं नकोत, अशी भावना महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जागेची मागणी होत आहे.

गाठीभेटींवर जोर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कट्टर शिवसैनिक संदेश कार्ले आणि श्रीकांते पटारे इच्छुक आहे. या व्यक्तिरीक्त इतर इच्छुकांचा आकाडा मोठा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे घनश्याम शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ संदेश कार्ले यांनी भेट घेत, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार शरद पवारांकडे मागितली.

ठाकरेंच्या विचारावर ठाम

संदेश कार्ले यांनी 2019 मध्ये पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून निवडून लढण्यासाठी इच्छुक होते. तशी त्यांनी तयारी केली होती. परंतु उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यानंतर त्यांनी उमेदवारीतून माघार घेतली. संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तीन वेळा त्यांनी धनुष्यबाण चिन्हांवर जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आहे. या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. शिवसेना फुटीनंतर देखील संदेश कार्ले यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संपर्क करण्यात आला होता. परंतु ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठाम राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT