Gen-Z Student Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gen-Z Student Protest : 'Gen-Z'वर पोलिसांचा अत्याचार वाढला, ठाकरेंचा शिलेदार संतापला; न्याय व्यवस्थेला सुनावत एकाचवेळी वाघ, राणे, पडळकर अन् जगतापांवर बरसला

Shiv Sena UBT leader seeks judicial probe into police action allegations : दिल्ली व मुंबई येथे Gen-Z विद्यार्थी आंदोलना दरम्यान विद्यार्थिनी, युवती, महिला आंदोलनकर्त्यावर दिल्ली अन् मुंबई पोलिसांकडून अत्याधिक बळाचा वापर, मारहाण तसेच गैरवर्तन झाल्याचे गंभीर आरोपांनी समाज माध्यमे व्यापली आहे

Pradeep Pendhare

Delhi Mumbai Police Action : दिल्ली व मुंबई येथे Gen-Z विद्यार्थी आंदोलना दरम्यान विद्यार्थिनी, युवती, महिला आंदोलनकर्त्यावर दिल्ली अन् मुंबई पोलिसांकडून अत्याधिक बळाचा वापर, मारहाण तसेच गैरवर्तन झाल्याचे गंभीर आरोपांनी समाज माध्यमे व्यापली आहे. केंद्रातील अन् राज्यातील सत्ताधीश मात्र या अन्याय, अत्याचाराला छुप्यापद्धतीने खतपाणी देत आहे, असा गंभीर आरोप करत, हिंदुत्वाच्या नावाने रोज दिंडोरा पिटणारे भाजपच्या पिलावळींना आता हिंदू मुलींवर झालेला अत्याचार, अन्याय दिसत नाही का? राजरोसपणे विनयभंग, आंदोलन दडपण्याच्या नावाखाली नको त्या ठिकाणी मुलींनी पोलिसांकडून होणारा जबरदस्तीचा स्पर्श!

आता हे बलात्कार होण्याची वाट पाहणार आहेत का? आता कुठे आहेत चित्रा वाघ, नीतेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप? असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगर शहराचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे.

दिल्ली अन् मुंबई पोलिसांकडून आंदोलनातील मुलींना टार्गेट करत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena UBT) किरण काळे यांनी एक्सवर संबंधित व्हिडिओसह सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांना टॅग करत त्यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. किरण काळे यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे.

किरण काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. संबंधित दोषी पोलिस अधिकारी, कर्मचारी, पोलिस (Police) वेशातील खासगी व्यक्ती यासर्वांविरुद्ध तातडीने विनयभंगासह अन्य योग्य त्या कलमां अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय व मुंबई हायकोर्टाने द्यावेत. तसेच लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, याचीही सखोल चौकशी करण्यात बाबत आदेश देण्याची मागणी काळे यांनी केली आहे.

महिलांचा सन्मान, घटनात्मक अधिकार आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी न्याय मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच न्याय होताना दिसणेही आवश्यक असल्याचे काळे यांनी नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणांमध्ये झालेला हिंसाचार पाहण्यासाठी वेळ नाही. आंदोलक युवा पिढी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहेत. त्यांचं आणि पुढच्या पिढ्याचं भवितव्य त्यांना अंधकारमय दिसत आहे. सरकार विरोधातील प्रचंड रोष धगधगत असताना झुरळ म्हणून ज्या न्यायव्यवस्थेने युवकांना डिवचलं त्यांनी आता युवकांना त्यांचा मोर्चा देशाच्या न्यायव्यवस्थेकडे उचलण्याची वेळ येणार नाही, यासाठी संविधानाला अपेक्षित असणारी आपली जबाबदारी निभावावी, अशी खोचक टिप्पणी किरण काळे यांनी केले आहे.

त्या तर औरंग्याच्या औलादी

बाबर, मोहम्मद शाह अब्दाली, औरंगजेब या नराधमांनी अनेक वेळा हिंदुस्तान लुटला. स्वाऱ्या केल्या. राज्य केलं. त्यांच्या राज्यात आपल्या आया-बहिणींची अब्रू लुटली गेली. क्रूरपणे बलात्कार करण्यात आले. नीट आंदोलनकर्त्या विद्यार्थिनी युवतींवर लाठीचार्जच्या नावाखाली ज्यांनी विकृत पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केला त्या तर औरंग्याच्या औलादी आहेत.

वाघ, राणे, पडळकर अन् जगताप कुठे आहेत?

आंदोलनकर्त्यांमध्ये असणाऱ्या युवती या बहुतांशी हिंदू आहेत. हिंदुत्वाच्या नावाने रोज दिंडोरा पेटत समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजपच्या पिलावळींना हिंदू मुलींवर झालेला अत्याचार दिसत नाही का? राजरोसपणे विनयभंग झाले आहेत. आता हे बलात्कार होण्याची वाट पाहणार आहेत का ? चित्रा वाघ, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आता कुठे गायब आहेत ? यांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात कधी निघणार आहे ? असा संतप्त सवाल करत किरण काळे यांनी भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT