Shivsena
Shivsena  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नंदूरबारमध्ये के.सी.पाडवींना धक्का; शिवसेनेने फडकवला भगवा

सरकारनामा ब्युरो

नंदूरबार : धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (K.C. Padavi) यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतमध्ये काँग्रेसला (Congress) फक्त 03 जागा मिळाल्या आहे. विशेष म्हणजे भाजपाने (BJP) आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच धडगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवार रिंगणात उभे केले होते. भाजपला 01 जागेवर समाधान मानावे लागले आहे. (Nagar Panchayat Election Results)

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 17 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांपैकी फक्त 03 जागांवर विजय मिळवता आला आहे. धडगाव नगरपंचायत मधील निकालाचे चित्र पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धडगाव नगर पंचायत मध्ये मंत्री के.सी.पाडवी यांना मोठा झटका बसला आहे.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके व जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांनी शिवसेनेसाठी कंबर कसली होती. अखेर शिवसेनेने विजयश्री खेचून आलात धडगाव नगरपंचायती वर भगवा फडकवला आहे.

तर, राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे गाव असलेल्या कडेगावमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे कदम यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्वतंत्र पॅनेल टाकल्याने काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्याची चर्चा आहे. भाजपला (BJP) 10 तर काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT