Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar District Central Cooperative Bank  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच शिवाजी कर्डिलेंची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Shivaji Kardile : अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्ष पदाचा पदभार घेतला. पदभार घेताच त्यांनी मोठी घोषणा केली.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी घोषणा कर्डिलेंनी माध्यमांशी बोलताना केली.

कर्डिले म्हणाले, ''माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला दोनदा जिल्हा बँकेत संचालक होण्याची संधी मिळाली. यानंतर आता बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळाली आहे''.

''जेव्हा मी बँकेचा अध्यक्ष नव्हतो. तेव्हाही सर्वांची कामं मी करत होतो. त्यामुळे आता मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे'', असं म्हणत ''जिल्हा बँकेत लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे'', असंही ते यावेळी म्हणाले.

''अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस संचालकांच्या बैठकीत सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. या निवडणुकीत संचालकांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला अध्यक्षपदाची संधी दिली '', असं ते म्हणाले.

दरम्यान,''सध्या बँकिंग क्षेत्रात नॅशनलाईज बँकेचे मोठे आव्हान आहे. कर्जदार आणि खातेदारांना ई-बँकिंगसह अनेक सेवा देण्यास बँक कटिबद्ध आहे. तसेच बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे'', असं शिवाजी कर्डिले यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT