Amol Khatal And Shubhangi Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Khatal And Shubhangi Patil : अमोल खताळांचा दिवाळीनंतरचा डाव सुरू? थोरात-तांबेंच्या विरोधकाला सोबत घेत भाऊबीज साजरी!

MLA Amol Khatal Bhaubeej celebration with Shubhangi Patil sparks political speculation in Sangamner over a possible new equation against Balasaheb Thorat- Satyajeet Tambe : शुभांगी पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या भेटीने संगमनेरमध्ये चर्चांना उधाण; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवी राजकीय जुळवाजुळव?

Pradeep Pendhare

Sangamner Politics : एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांनी, राजकीय प्रतिस्पर्धी थोरात-तांबे मामा-भाच्याविरोधात डाव टाकण्या सुरूवात केल्याचे दिसते.

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांच्याविरोधात निवडणूक लढलेल्या शुभांगी पाटील यांनी आमदार खताळ यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी हजेरी लावत, भाऊबीज साजरी केली. आमदार खताळ-शुभांगी पाटील यांचे भाऊ-बहिणीचे हे नाते पहिल्यादांच समोर आल्याने, त्याचा संगमनेरमध्ये राजकीय अर्थ लावला जाऊ लागला आहे.

भाऊबीज सणाचे निमित्ताने साधून, शुभांगी पाटील यांनी आमदार खताळ यांच्या संगमनेरमधील (Sangamner) निवासस्थानी हजेरी लावली. आमदार खताळ यांचे औक्षण करून, भाऊबीज साजरी केली. आमदार सत्यजीत तांबे यांच्याविरोधात नाशिक पदवीधरमधून महाविकास आघाडीकडून, शुभांगी पाटील यांनी लढत होती. आमदार खताळ आणि थोरात-तांबे मामा-भाचे यांचे राजकीय प्रतिस्पर्धा सर्वश्रुत आहे. यातच शुभांगी पाटील यांनी आमदार खताळ यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केल्याने आगामी राजकीय गणितांची चर्चा संगमनेरमध्ये चर्चेला सुरूवात झाली आहे.

शुभांगी पाटील पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात (Shivsena UBT) होत्या. उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या होत्या. महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. शिवसेना ठाकरे पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत, तीन जुलै 2026 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीत असताना, नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांना सुमारे 40 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती.

नगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्ह्यात सहकारी बँकेची निवडणूक झाली. या एकनाथ शिंदे शिवसेनेला म्हणावी, तशी कामगिरी करता आलेली नाही. जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण कार्यकारिणीत देखील मतमतांतरे आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसने एकनाथ शिंदे शिवसेनेला पुरती एकटे पाडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्याबरोबर एकनाथ शिंदे शिवसेने लंगडा पॅनल उभा केला होता. यात फक्त खासदार लंके निवडणूक आले. एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुत्राचा या निवडणुकीत पराभव झाला. एकदंर शिवसेनेला जिल्हा बँकेत कुठेच स्थान मिळाले नाही.

महायुतीत एकनाथ शिंदे शिवसेना एकटी

आमदार खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून कामाचा धडाका लावला आहे. यातून ते संघटन बांधणीचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बांधणीचे गणित आखत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोरे जाताना बेरजेची गणित महायुतीत फिस्कटेल, याची दाट शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदे शिवसेनेला अहिल्यानगर जिल्ह्यात याचा अंदाज यायला सुरूवात झाली आहे.

आमदार खताळांचे संघटन बांधणी

यातून एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राजकीय प्रतिस्पर्धांच्या विरोधकांशी बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे, शुभांगी पाटील यांच्या भेटीवरून दिसते, अशी चर्चा सुरू झाली आहे. यातून संगमनेर मतदारसंघात आमदार खताळ संघटन बळकटीला वेग देत असल्याचे त्यांच्या भोवतीच्या जाणकारांनी सांगितले.

आमदार खताळांची थोरात-तांबेंवर टीका

आमदार खताळ काही दिवसांपासून, थोरात-तांबे यांच्यावर नाव न घेता टीका करताना दिसत आहे. त्यांच्या या टीकेला थोरात-तांबे मामा-भाचेकडून कोणतेच प्रत्युत्तर मिळताना दिसत नाही. आमदार खताळ यांनी काही दिवसांपूर्वीच, मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. मला राजकारण शिकवण्याच्या फंदात कोणीही पडू नका. राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे दाखवून देईल. दिवाळीनंतर डावपेच काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल", असा सूचक इशारा थोरात-तांबे यांचे नाव न घेता दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT