Chandrashekhar Bavankule & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : जोर, बैठका बावनकुळेंच्या; खासदारकीची स्वप्ने दादा भुसे यांची!

Sampat Devgire

BJP & Eknath Shinde Shivsena News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच धुळे लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून दिले. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नेत्यांना बारीक सारीक तयारीच्या टिप्स दिल्या. त्यामुळे डेंजर झोनमधील या मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. (Shivsena (Eknath Shinde group) calmly preparing for Dhule loksabha seat)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) धुळे मतदारसंघासाठी (Dhule) विशेष प्रयत्न करीत आहेत. भाजपकडे (BJP) असलेल्या या मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे चिरंजीव आविष्कार भुसे येथून इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी कोणाची याची उत्सुकता आहे.

बावनकुळे यांनी नुकताच धुळे लोकसभा प्रवासादरम्यान मालेगाव येथे भाजपा सुपर वॉरियर्स व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. धुळे लोकसभा मतदारसंघाचा हा त्यांचा अलीकडच्या काळातील तिसरा दौरा आहे. अतिशय बारीक विचार करून ते बूथ स्तरावर बांधणी करीत आहेत. एवढेच काय विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गात काही नियम आडवे आल्यास नवा उमेदवार म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांना भाजपने प्रवेशदेखील दिला आहे. इच्छुक उमेदवार म्हणूनच दिघावकर मतदारसंघात फिरत आहेत.

एकंदरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय मेहनत घेत आहेत. जोर बैठका मारीत आहेत. त्यांची एवढी मेहनत असतानाच पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते दादा भुसे हे मात्र धुळे लोकसभा मतदारसंघातून आपले चिरंजीव आविष्कार भुसे यांना खासदार करायचेच असा मनोमन संकल्प करून आहेत. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून आविष्कार भुसे विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून तर विविध उपक्रमांत आपले फ्लेक्स लाऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी हे प्रतिनिधिक चित्र आहे. अशी स्थिती अनेक मतदारसंघात आहे. जिथे शिंदे गटाचे खासदार आहेत, तिथेदेखील भाजपचा राजकीय उंट शिंदे यांच्या तंबूत शिरल्याने नेते, खासदार अस्वस्थ आहेत. अशा स्थितीत नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. अशा स्थितीत नाशिकला विद्यमान खासदार तर शेजारी भाजपचा खासदार अन् दोन्हीकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेली एकनाथ शिंदे गटाचे इच्छुक, यात चंद्रशेखर एवढ्या जोर बैठका शिंदे गटासाठी मारीत आहेत का, असा प्रश्न पडतो. त्यात भाजपचे नेते अतिशय आत्मविश्वासाने खासदार आमचाच असे सांगत असल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी पक्षाचे राजकारण चर्चेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT