DR. Vikrant More
DR. Vikrant More Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचा शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुखच फोडला?

Sampat Devgire

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे (Dr Vikrant More) यांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीमुळे शिवसेनेला (Shivsrna) जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपला राजीनामापत्र शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांना सादर केले आहे. त्यामुळे राजीनामाबाबत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यांचे भाजप प्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Shivsena District head Dr Vikrant More resigne Party)

नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. विक्रांत मोरे यांनी युवा कार्यकर्त्यांचा माध्यमातून शिवसेनेची मोट बांधली होती. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व दाखविले आहे. शिवसेनेला आता चांगले दिवस आले होते. असे असताना पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ते काही दिवसापासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी १९ एप्रिलला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण माझी नेमणूक शिवसेना जिल्हा प्रमुखपदी करून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील. मी सुद्धा आपल्या विश्वासाला तडा जाऊ न देता पक्षाचे काम निष्ठेने केले. नंदुरबार नगरपालिकेत शिवसेनेचे प्रथमच चार नगरसेवक निवडून आणले. माझ्या आई शिवसेनेच्या प्रथम उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या, एवढ्यावरच न थांबता अनेक सामाजिक उपक्रम राबविले, न्यायासाठी अन्यायाविरुद्ध आंदोलने केले.

ते म्हणाले, पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. पक्ष संघटनासाठीचे नेत्यांचे नंदुरबार जिल्ह्यातील दौरे यशस्वी केले. एकंदरीतच जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे व शिवसेनेचा झंझावात पाहून इतर पक्षातील अनेक नेते शिवसेनेत आल्याशिवाय पर्याय उरला नाही. अशी परिस्थिती निर्माण केली. परंतु पक्षीयस्तरावरून माझ्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, असे मला वाटत आहे. नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण व्यक्ती केंद्रित चालले असून पक्षाचे प्रोटोकॉल कुठेच पाळला जात नाही, असे विदारक दृष्य मी जिल्हाप्रमुख पदावर राहून पाहू शकत नाही. मी व्यवसाय करून राजकारण करतो. त्यामुळे जरी आपली सत्ता असली तरी जिल्हाप्रमुख पदावर राहण्याचा मला मोह नाही. माझ्या पदावरून मला आपण मुक्त कराल, ही आशा व्यक्त करतो. असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांना धुळे -नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात व पक्षातील अन्य नेत्यांनी भेटून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. डॉ. मोरे हे निर्णयावर ठाम आहेत. नगर पालिका निवडणुका तोंडावर असताना डॉ. मोरे हे पक्षाचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजप प्रवेश निश्‍चित

डॉ. विक्रांत मोरे यांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा संपर्कात भाजपचे नेते होते. अद्यापही आहेत.त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे.येत्या दोन दिवसात प्रवेश होऊ शकतो. तशी तयारी भाजपकडूनही सुरू झाली आहे. मात्र प्रवेश नंदुरबारात की मुंबईत एवढाच प्रश्‍न उरला असल्याचे त्यांचा निकटवर्तीयांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT