Shivsena MLA Chandrakant Patil & NCP leader Eknath Khadse
Shivsena MLA Chandrakant Patil & NCP leader Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंच्या पराभवासाठी गिरीश महाजन- शिवसेना युती? सेना आमदार म्हणतात...

Sampat Devgire

बोदवड : शिवसेनेची भाजपशी कोणतिही छुपी युती किंवा राजकारण नाही. आम्हाला जे करायचे ते उघडपणे करू. शिवसेना (Shivsena) लपुन छपुन काहीच करीत नाही. जे करते दिवसा ढवळ्या करते, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना आज दिले.

आज बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे मतदान झाले. यावेळी सर्व पक्षांत मोठी चुरस होती. त्यावर एकनाथ खडसे व त्यांचे पारंपारीक विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोप प्रत्यारोप झाले. त्याबाबत आमदार पाटील यांनी खडसेंना उत्तर दिले.

ते म्हणाले, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची नुकतीच एकनाथ खडसेंचे विरोधक व भाजप नेते गिरीष महाजन यांची भेट झाली. या आरोपांबाबत आमदार पाटील म्हणाले, आम्हाला कोण कट्टर विरोधक समजतात हे माहीत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांत ३ मध्ये श्री. कुलकर्णी यांच्याकडे गिरीश महाजन बसले होते. मी तिथे प्रचार करीत असताना ते मला दिसले म्हणून सहजीकच त्यांची भाट झाली. एकमेकांना भेटल्यानंतर किमान विचारपूस केली पाहिजे. एव्हढ्यापुरतीच ती बैठक झालेली आहे. मी हाय, हॅलो केले आणि पाच मिनीटे बसलो व चहा घेतल्यानंतर निघालो. त्यात काहीही राजकीय चर्चा झाली नाही. मी त्यांना मतदान करण्याची विनंती केली, त्यांनीही मला प्रतिसाद दिला, एव्हढेच झाले. यावेळी अनेक लोक उपस्थित होते. ती काही बंद दाराआड झालेली चर्चा नाही. त्याचे चुकीचे अर्थ काही लोक काढत आहेत.

ते म्हणाले, ज्या चार जागांवर निवडणूक होत आहे, त्यातील दोन जागांवर भाजप आणि आमचीच लढत आहे. प्रभाग तीनमध्ये आमच्या उमेदवार सौ खेवलकर यांच्या विरोधात भाजपच्याच उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील त्यांचेच उमेदवार आमच्या विरोधात आहेत. त्यांच्याच विरोधात आम्ही लढतो आहोत. त्यांनी चारही जागांवर उमेदवारांचा विचार सोडा मात्र दोन जागांवर त्यांच्याशी शिवसेनेच्या उमेदवाराचीच लढत आहे. या दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार शंभर टक्के विजयी होणार आहेत.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची भाजपशी छुपी युती असल्याची चर्चा रंगली आहे, याविषयी विचारले असता, त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. आम्ही कोणतेही काम छुपे करीत नाही. जे काही करु ते दिवसाढवळ्या करू. त्यात काही घाबरण्याचे कारण नाही. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तारवीरल जे राजकारण असते ते तिथेच संपवायचे असतो. हे विकासाचे राजकारण असते. त्यात कोणतेही पक्ष एकत्र येऊ शकतात. अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत. काही ठिकाणी भाजप, शिवसेना एकत्र आले तर काही ठिकाणी भाजप काँग्रेस एकत्र आलेले दिसतात. यामध्ये एकत्र यायला आम्हाला काही छुपे काम करण्याची गरज नाही. तसे काहीच घडलेले नाही. आज शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष निवडणुकीत एकमेकांचे राजकीय बल आजमावत आहे.

शिवसेना सत्तेसाठी भाजपची मदत घेईल का? या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, आम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. सर्व सतरा जागांवर आमचे उमेदवार विजयी होणार आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी निवडणुकीत भाग घेऊ नये व मतदारांत त्यांना जाता येऊ नये, यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याबाबत आम्ही पुरावे दिले आहेत. त्याचा पोलिस योग्य तो तपास करतील. त्याबाबत उच्चस्तरीय समिती माहिती घेईल. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत जाता येऊ नये यासाठी खोटे गुन्हे दाखल केले हे मतदारांपर्यंत जाऊ द्या. मतदार सुज्ञ आहेत. योग्य निर्णय घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT