Babanrao Gholap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Shivsena news : ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा

Shivsena Dy. Leader Babanrao Gholap resign from the post-शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वाकचौरे इन, बबनराव घोलप आऊट?

Sampat Devgire

Babanrao Gholap News : देवळाली मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी समाज कल्याणमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांना संपर्कप्रमुख पदावरून कमी केल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. हा शिर्डी लोकसभा तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी धक्का आहे. (Ex Minister Babanrao Gholap`s resignation as Shivsena dy. leader)

घोलप (Babanrao Gholap) यांच्या राजीनाम्यामुळे नाशिकच्या (Nashik) राजकारणात आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) चर्चेचा विषय आहे. संपर्क नेत्यांच्या पुनर्रचनेचे पडसाद म्हणून उद्धव ठाकरे गटाला (Shivsena) हा धक्का आहे.

शिवसेना ठाकरे गट शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर घोलप पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, देवळाली या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे घोलप यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी आमदार योगेश घोलप पाच वर्षे आमदार होते. तीस वर्षांच्या कालावधीत त्यांना शविसेनेने राज्याचे समाज कल्याणमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती.

गत विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे यांच्याकडून योगेश घोलप पराभूत झाले होते. घोलप गेले दहा वर्षे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देतील अशी शक्यता होती. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी शविसेनेत प्रवेश दिला. तो घोलप यांना मोठा धक्का मानला जात होता.

नुकत्याच केलेल्या पुनर्रचनेत लोकसभा संपर्क नेते प्रमुख म्हणून माजी आमदार विलास शिंदे यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे घोलप यांचा पत्ता कट झाल्याची चाहूल लागली होती. या पार्श्वभूमीवर घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत घोलप म्हणाले, शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मी सध्या शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता लोकसभा संपर्कप्रमुख पदावरून मला काढण्यात आल्यामुळे मी राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT