Chandrakant Raghuwanshi with students
Chandrakant Raghuwanshi with students Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चंद्रकांत रघुवंशी यांची विद्यार्थ्यांशी 'आईस्क्रीम पे चर्चा'

Sampat Devgire

नंदुरबार : आता उन्हाळ्याचे (Summer) दिवस असल्याने कोणीही बाहेर खेळायला जाऊ नये, सायंकाळीच मनसोक्त खेळा, खेळासोबत भरपूर अभ्यास करून मोठं व्हा, आपल्या आई बाबांचा व मोठ्यांच्या आदर करा ,असा सल्ला देत शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम वाटप करीत संवाद साधला.

नंदुरबार शहरात अनेक शाळांच्या परीक्षा संपलेल्या आहेत.शाळांनाही लवकरच सुट्ट्या लागणार आहेत. मोठ्यांशी नेहमीच सुसंवाद होत असतो. परंतु,चिमुकलयांसोबत देखील संवाद व्हायला पाहिजे. या हेतूने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी 'आईस्क्रीम पे चर्चा' केली.

यावेळी ते म्हणाले, तासन् तास मोबाईल वर व्हिडिओ गेम पाहू नका, व्हिडिओ गेम पाहिल्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता असते, शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत भरपूर अभ्यास करावा, अभ्यासासोबत विविध प्रकारचे खेळ खेळावेत, जेणेकरून आरोग्य सुदृढ राहील., विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र, पुस्तकांचे वाचन करावे, कविता कराव्यात.,थोर महापुरुषांच्या आत्मकथा वाचाव्यात, शुद्धलेखनाच्या सराव करावा, असा मोलाचा सल्ला देत संवादातून बालमनावर गुड बॉय चे संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न केला.श्री. रघुवंशी हे लहान मुलांचे आवडते नेते आहेत. मुलांना गोडी लावतात म्हणून शहरातील लहान बालकांमध्येही चंदुभय्या हे नाव प्रसिध्द आहे. त्यांचे छायाचित्र एखाद्या पहिलीचा वर्गातील बालकास दाखविल्यास तोही क्षणात त्यांना ओळखेल, असा लळा त्यांना लहान बालकांचा आहे.

यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, नगरसेवक दीपक दिघे, पत्रकार हिरालाल चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना आईसक्रीमचे वाटप करण्यात आले.

मस्तीमुळे नापास झालो

विद्यार्थ्यांनी मस्ती न करता भरपूर अभ्यास करावा. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात करिअर करावे. एखादी कला अवगत करा त्या कलेकडे वळावं त्यामुळे सर्वांगीण विकास होईल.मी लहान असतांना खूप मस्ती करायचो. मस्तीत अभ्यास होत नव्हता. त्यामुळे एकदा नापास झाल्याच्या बालपणाच्या अनुभव माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थी संवादातून कथन केला.

----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT