Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील म्हणाले, निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू...

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे नेते नेते एकमेकांवर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. शिवसेना (Shivsena) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे हे कोण आहेत? हे निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?' अशा शब्दांत पाटलांनी राणेंवर टीका केली आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा पाटलांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रत्नागिरी येथील कार्यक्रमात निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतांना फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील आणि असे ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्याचा समाचार पाटीलांनी आज (ता.13 मार्च) घेतला आहे. याबरोबरच फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीनंतर भाजपकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. फडणवीसांसोबत काही चुकीचे झाले असेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत असेल म्हणून ते आंदोलन करत आहे. आंदोलन करणे चुकीचे नाही, मात्र करण्यात येत असलेल्या आंदोलनाचा नागरिकांना त्रास व्हायला नको तसेच वाहने व नागरिकांना वेठीस धरू नये, असे मत पाटीलांनी व्यक्त केले.

दरम्यान, या कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली होती. ते यावेळी म्हणाले की, मागील दोन वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने विशेषत: कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात उल्लेखनीय कामे केलेली आहेत. त्यामध्ये उच्चदाब वितरण प्रणाली आणि इतर योजनेत 33 केव्ही क्षमतेची नवीन 6 उपकेंद्रे उभारल्याची माहिती राऊतांनी दिली. तर ज्यांची कायम वीज तोडण्यात आली आहे, त्यांच्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना 1 मार्चपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही राऊत यांनी केले. तसेच गुलाबराव पाटीलांच्या कामांचे कौतूक करत त्यांच्यासारखे खंबीर नेतृत्व जिल्ह्याला लाभले असे सांगत पाटलांची स्तुतीही करायला ते विसरले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT