Gulabrao Patil, Raj Thakre News
Gulabrao Patil, Raj Thakre News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा'

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या आहेत,आता त्यांनी भोंगा आणला मात्र, त्याचा ठेंगा झाला आहे, अशी खोचक टीका शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. त्यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. (Shivsena Leader Gulabrao Patil Criticizes Raj Thackeray)

पाटील म्हणाले की, या माणसाने आतापर्यंत तीन वेळा आपली भूमिका बदलली आहे. आता त्यांना चौथी भूमिकाही बदलणे त्यांना अवघड नाही. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी झेंडाही चार रंगाचा ठेवला होता. तर पक्ष स्थापन करण्याअगोदर मराठीची भूमिका घेत उत्तर प्रदेशच्या लोकांच्या कानफटात मारली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. त्यानंतर मोंदीच्या विरोधी भूमिका घेत 'लाव रे तो व्हीडीओ' म्हणत त्यांच्यावर टिकाही केली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलत झेंड्याचा रंग बदलला आणि आता पुन्हा मोदींची प्रशंसा करत आहेत. आता त्यांनी 'भोंगा' काढला. मात्र आता त्याचा 'ठेंगा' झाला आहे, अश्या शब्दात राज यांची खिल्ली गुलाबरावांनी उडवली आहे.

ओबीसी आरक्षणावर विचार सुरू

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द ठरवत, त्या आरक्षणाशिवाय पंधरा दिवसात महापालिका, व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर करण्याचा आदेश दिला. याबाबतच्या प्रश्‍नांला उत्तर देतांना पाटील म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा ठराव सर्वानुमते विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. त्याच आधारावर आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो. त्याच आधारावर मध्यप्रदेश सरकारही सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व राज्यासाठी आहे. त्यामुळे न्यायालयाने निवडणुकीच्या तयारीसाठी पंधरा दिवसाचा दिलेला कालावधी अत्यंत कमी आहे. याबाबत तज्ञ मंडळी अभ्यास करीत असून याबाबत काय पर्याय आहे? याचा विचार करीत आहे.

ओबीसीना न्याय मिळावा ही राज्यातील सर्वच पक्षाची मागणी आहे, ते जर झालं तर डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व घटकांना न्याय देवून आरक्षण दिले आहे. त्यामुळे सर्व घटकांना न्याय मिळणार आहे. मात्र न्यायालयाचा सकारात्मक निर्णय आलाच नाही. तर आहे त्या परिस्थितीत निवडणुक लढण्याची तयारी सर्वच पक्षाला करावी लागणार असल्याचेही पाटलांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT