Unaccounted Money Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Election: धक्कादायक; मालेगावात हवाला रॅकेट? युवकांच्या खात्यात आले सव्वाशे कोटी!

Malegaon Merchant Bank transactions: निवडणुकीच्या कालावधीतच मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये सव्वाशे कोटींची उलाढाल!

Sampat Devgire

Malegaon News: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांवर निवडणूक शाखा लक्ष ठेवून आहे. अशातच मालेगावात मोठे हवालदार रॅकेट असण्याची शक्यता पुढे आली आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसात शंभर ते सव्वाशे कोटींची उलाढाल झाली.

मालेगाव मर्चंट बँकेत काही युवकांच्या खात्यात सव्वाशे कोटींची उलाढाल झाली आहे. सिराज अहमद यांनी पुढाकार घेऊन दहा ते बारा युवकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी या युवकांकडून आधार कार्ड पॅन कार्ड व अन्य माहिती जमा केली होती.

त्याआधारे या बँकेत खाते उघडण्यात आले. या युवकांनी बँकेत चौकशी केली असता, विविध संस्थांच्या नावे उघडलेल्या या खात्यांमध्ये मोठी उलाढाल झाल्याचे आढळले. यामुळे संबंधित युवकांना धक्काच बसला.

संबंधीतांनी तातडीने शिवसेना मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात संपर्क केला. त्यानंतर याबाबत चौकशीचे सूत्र खाल्ली संजय दुसाने यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देत या प्रकरणाची गंभीर चौकशी करावी, अशी मागणी केली.

निवडणुकीच्या कालावधीत पैशाचा दुरुपयोग करण्यासाठी मालेगाव शहरात मोठे हवालदार रॅकेट कार्यरत आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलिसांनी याबाबत संबंधित मका व्यापारी सिराज अहमद याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

मालेगाव मर्चंट बँकेत सिराज अहमद यांनी संबंधित युवकांच्या नावे सागर ट्रेडिंग, स्वस्तिक ट्रेडिंग, कोरम एजन्सी, पार्क व्हील ट्रेडिंग, एक्सेस ट्रेडर्स, ग्लोबल इंटरप्राईजेस, सनराईज ट्रेडर्स, मेघा ट्रेडर्स, एस. एल. मार्केटिंग, रेड रोज ट्रेडिंग कंपनी अशा नावाने ही खाती उघडली होती.

त्या प्रत्येक खात्यात दहा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे आढळले. एकत्रितरित्या ही सर्व उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची असल्याने पोलीसही सक्रिय झाले आहेत. या पैशांचा उपयोग कोणत्या कामासाठी करण्यात आला, हे पैसे कोणी जमा केले आणि त्याचे वितरण कोणासाठी झाले, याचा तपास करण्यात येत आहे.

निवडणूक शाखेने देखील याबाबत लक्ष घातले असून मालेगाव शहरात हवाला ट्रेडिंग कार्यरत झाले आहे की काय? याचा तपास करण्यात येत आहे. निवडणूक शाखेकडून राजकीय पक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या व्यवहारावर लक्ष ठेवले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT