Shivsena Rebel Ajay Boraste
Shivsena Rebel Ajay Boraste Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Rebel; मी गद्दार नाही, पण सिल्वर ओकचे दलाल कोण?

Sampat Devgire

नाशिक : आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकच्या (Nashik) विकासाचा शब्द दिल्याने आम्ही शिंदे गटात प्रवेश केला. आमचा शिवसेनेच्या (Shivsena) कोणत्याही नेत्यावर आक्षेप किंवा नाराजी नाही, मात्र आम्हाला गद्दार, दलाल म्हणू नये असे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी म्हटले आहे. (Do not say traitor to us, we are join shinde group for Devolopment)

शिंदे गटात प्रवेशकर्त्या झालेल्या माजी नगरसेवकांना दलाल व गद्दार असा उल्लेख केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता बोरस्ते यांनी त्यांच्यावर पलटवार केला. नाशिकमध्ये केवळ पर्यटनासाठी येणारे व सिल्वर ओकचे दलाल कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दलाल व गद्दार असे शब्द प्रयोग केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ माजी नगरसेवकांचे नेतृत्व करणाऱ्या बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई, पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे शहर आहे. मात्र, अनेक वर्षांपासून त्रिकोणाची एक बाजू अर्थात नाशिकचा विकास ठप्प झाला आहे. औरंगाबाद ठाणे व नागपूरच्या तुलनेत नाशिककडे दुय्यम अंगाने बघितले जाते. वास्तविक सर्व प्रकारच्या क्षमता असताना नाशिकचा हवा तसा विकास झालेला नाही.

विकासासाठी राजकीय दूरदृष्टी व पाठबळ हवे असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिकच्या विकासाची दृष्टी बदलली आहे. नाशिकच्या विकासाकडे बारकाईने पाहिले जाते. ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कामे बाजूला ठेवून नाशिकचा दौरा केला. या वेळी अपघातग्रस्तांची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, नाशिकबद्दल शिंदे यांच्या मनात आस्था आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नाशिकच्या विकास होऊ शकतो. नाशिकचा विकास रोखण्याचा कपाळकरंटेपणा आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.

पक्षांर्तगत कुरबुरी

आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही, मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत कुरबुरी व टोमणेबाजी सुरू होती. यामुळे मानसिक त्रास झाला. पक्ष सोडून जावा असे काहींनी प्रयत्नदेखील केले, चुकीच्या अफवा पसरविल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण नाशिकच्या विकासासाठी प्रवेश करत असल्याचे बोरस्ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT