Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Politics news : शिंदे गटाला धक्का, म्युनिसिपल सेना ठाकरे गटाकडे

महापालिका कामगार सेनेवर वर्चस्वावरून सत्तेचा उपयोग करणाऱ्या शिंदे गटाला जोरदार धक्का

Sampat Devgire

Shinde V/s Thackeray politics : राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका मुख्यालयातील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनबरोबरच कार्यालयावर मिळवलेला ताबा चांगलाच अंगलट आला. ठाकरे गटाने महापालिकेतील कार्यालयाचा ताबा घेत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. (Thackeray group given a big shock to Shinde Group in NMC Workers politics)

उच्च न्यायालयाच्या (HC) आदेशानुसार आज कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मिळाला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे (NMC) अध्यक्ष व शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे कार्यालयाचा ताबा देण्यात आल्याने शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मागील वर्षाच्या जून महिन्यात उभी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट बाहेर पडला. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिकेमध्ये सर्वांत मोठी संघटना असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेवर दावा केला.

कामगार सेनेचे कार्यालयदेखील ताब्यात घेतले. याविरोधात संघटनेचे अध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संघटनेची सूत्रे हाती घेताना मुख्यालयातील शिवसेनेच्या कार्यालयाची मागणी केली. परंतु शिंदे गटाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर श्री. बडगुजर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये २४ ऑक्टोबर २०२२ प्रवीण तिदमे यांच्या विरोधात तक्रार दिली. तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाने कार्यालय सील केले. प्रशासनाकडून झालेली कारवाई ही एकतर्फी असल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला होता. कार्यालय सील करण्याच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती रेवती ढेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी २७ जूनला निकाल दिला.

त्यात बडगुजर यांची नियुक्ती योग्य ठरविण्यात आली, तर कार्यालय संघटनेकडे सोपविण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाच्या आदेशाची प्रत महापालिका प्रशासनाला आज प्राप्त झाली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी कार्यालयाचे सील काढून मिळकत विभागाकडे दिले.

...

पोलिसांच्या दाबावामुळे पालिका प्रशासनाने कार्यालय सील केले होते; परंतु न्यायदेवतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी कार्यालयाचा ताबा मिळाला. असाच न्याय आम्हाला चिन्हाच्या बाबतीत देखील मिळेल.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT