Uddhav Thackrey & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT Politics: शिवसेनेच्या आंदोलनाच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या पॅकेजची घोषणा, मात्र फसवा फसवी करू नका!

Shivsena UBT Protest at Collector Office, Warns State Government for compensate befor Diwali, Deemands 50K relief per hectare-अवकाळी पावासाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

Sampat Devgire

Shivsena UBT News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी भरपाई द्यावी. यासंदर्भात राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकऱ्यांची फसवाफसवी करू नये. अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो, असा आरोप करण्यात आला.

या प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शासनाने संकटग्रस्त शेतकऱ्यांची फसवाफसवी करू नये. अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल.

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची शेती अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेली आहे. अनेकांची घरे, जनावरे, शेतीची बांधकामे, विहिरी नष्ट झाल्या. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता राहिली नाही. हे फक्त नैसर्गिक आपत्ती नाही तर शेतकऱ्यांच्या जीवावर आलेले एक संकट आहे.

लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेनेच्या आंदोलनाच्या दबावाखाली घाईघाईत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्यात कोरडवाहू शेतीला १८ हजार पाचशे, बागायती २७ हजार तर फळपीकांना ३२ हजार पाचशे प्रती हेक्टरी भरपाई मिळेल.

ही घोषणा स्वागतार्ह असली तरी, यामध्ये अनेक गंभीर विरुधाभास आणि अंबलबजावणीतील अडचणी स्पष्ट दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळाली पाहिजे. त्यात फसवाफसवी झाल्यास शिवसेनेच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी आमदार वसंत गिते यांनी दिला.

या संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि हमीभाव योजना त्वरित लागू करावी. पिक विमा कंपन्यावर नियंत्रण ठेवून पूरग्रस्तांना विम्याची भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर यतीन वाघ, केशव पोरजे, भैया मणीयार, दिलीप मोरे, उत्तम खांबाहाले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, सचिव मसूद जिलानी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT