BJP Vs Shivsena News: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे चांगलेच अडचणीत आले आहेत. प्रभागातील धोत्रे कुटुंबीयांवर श्री निमसे व त्यांच्या समर्थकांनी सशस्त्र हल्ला केल्याचे प्रकरण तापले आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक होत त्यांनी पिडीतांसह थेट पोलिस आयुक्तालय गाठले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याआधीच भाजपचे अनेक नेते विविध वादांमध्ये सापडू लागले आहेत. माजी नगरसेवक उद्धव निमसे हे देखील अशाच एका प्रकरणात अडचणीत आले आहेत. या प्रकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या हाती आयतेच कोलीत आले आहे.
शहरातील नांदूर नाका भागातील धोत्रे कुटुंबीयांवर माजी नगरसेवक निमसे यांच्या समर्थकांनी प्राण घातक हल्ला केला. दक्षिणात्य चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग काहींनी मोबाईल मध्ये चित्रीत केला. यात भाजपचे माजी नगरसेवक निमसे यांचा सहभाग दिसत आहे. पिडीत कुटूंबियांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडे मदतीसाठी धाव घेतला.
यामध्ये धोत्रे कुटुंबीयांनी लहान मुलांसह महिलांवर माजी नगरसेवक निमसे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यांनी आपल्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही या महिलांनी सांगितले. पीडित धोत्रे कुटुंब शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांस विविध पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले. यावेळी निमसे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला होत असताना माझे नगरसेवक निमसे तेथे उपस्थित होते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे श्री निमसे यांच्यावरही आता अटकेची टांगती तलवार आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला यानिमित्ताने भाजप विरोधात आणखी एक मुद्दा हाती लागला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. भाजप नेते राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने शहरभर गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. निमसे यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
पोलीस आयुक्तांनी याबाबत येत्या दोन दिवसात चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात या मुद्द्यावरून चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने श्री निमसे संकटात आले आहेत.
भारतीय जनता पक्षावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. नांदूर नाका येथे घडलेल्या घटनेने भाजप बचावात्मक स्थितीत आला आहे. आता भाजप विरोधकांना एक प्रबळ मुद्दा हाती लागल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यानिमित्ताने सक्रिय झाला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.