नाशिक : आज हजारो शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते व नेते बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात जोषपूर्ण घोषणा देत जमले. नाशिकला आजवर कधीही झाले नाही, असे आंदोलन त्यांनी केले. अमरधाममध्ये त्यांनी शिंदे यांच्यावर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केल. तो जोष, ती गर्दी पाहिली असती तर, पक्षप्रमुख उद्धव धानसभाठाकरे (Uddhav Thakre) यांच्यात नक्कीच हत्तीचे बळ आले असते. (Shivsena workers made harsh Agitation against rebel Eknath Shinde)
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंड केले. त्यांच्या गटात शिवसेनेचे चाळीस आमदार असल्याचे बोलले जाते. सध्या ते गुवाहाटी येथील तारांकीत हॅाटेलमध्ये मुक्कामाला आहेत. तेथून ते पक्षाला आव्हान देत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हालचाली करीत आहे. त्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत संताप आहे. त्याचे स्वरूप आज नाशिकमध्ये दिसले.
उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज शक्तीप्रदर्सन केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला झाडून सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक व त्यांचे समर्थक जमले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करून त्यांना श्रद्धांजलीपर भाषणे केली.
सकाळी अकराला शिवसेनेच्या शालीमार येथील कार्यालय येथून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो कार्यकर्ते जमले होते. या कार्यकर्त्यांतील जोषाने वातावरणच बदलून टाकले. हे हजारो कार्यकर्ते मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, साक्षी गणपती, भद्रकाली, खैरे गल्ली, गंगा घाट मार्गे अमरधाम येथे गेले. तेथे त्यांनी रितसर अंत्यसंस्काराचे सर्व विधी करून श्री. शिंदे यांचे अंत्यसंस्कार केले. शिंदे यांच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात उपनेते बबनराव घोलप, सुनिल बागूल, विजय करंजकर, वसंत गिते, विनायक पांडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, जयतं दिंडे, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर नयना घोलप, यतीन वाघ, योगेश घोलप, बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, देवा बिरारी, माजी महापौर विनायक पांडे, अॅड यतीन वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, मंदा दातीर, शोभाताई मगर, राजु मकासरे यांसह शहरातील सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.