Arvind Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचा लढा सत्तेसाठी नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी!

सिडको येथे शिवसंपर्क अभियानात खासदार अरविंद सावंत यांनी मार्गदर्शन केले.

Sampat Devgire

सिडको : शिवसेनेने (Shivsena) सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे सत्तेसाठी नाही, तर शिवसेना राज्याच्या (Maharashtra) अस्मितेसाठी लढत आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (Arvinf Sawant) यांनी केले. शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या अभियानाच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Shivsena is not in ground for power bu sate`s Pride)

यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अजय बोरस्ते, रंजना नेवाळकर आदी व्यासपीठावर होते.

श्री. सावंत म्हणाले, की सत्ता जनसेवेचे साधन आहे, मिरवण्याचे नाही ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ध्यानात ठेवा. सेनेची निर्मिती राज्याच्या विकासासाठी झाली आहे. महाराष्ट्रात सध्या जो दुष्टपणा सुरू आहे, तो जनतेपर्यंत पोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांमुळे भाजप राज्यासह देशात फोफावला हे त्यांनी विसरता कामा नये. शिवसेनेची ही अस्मिता सर्वांपर्यंत शिवसैनिकांनी पोचवत आगामी निवडणुकांमध्ये ती अधोरेखित केली पाहिजे.

संपर्कप्रमुख चौधरी यांनी बूथ पातळीवरून सुरू असलेल्या कामांचा ऊहापोह केला. महानगरप्रमुख बडगुजर यांनी नाशिक पश्चिम मतदार संघातील संभाव्य ५१ पैकी किमान चाळीस जागा शिवसेना जिंकेल, असे सांगितले.

सभागृहात भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांमुळे वातावरण भगवे झाले होते. या वेळी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, शरद गीते, संजय ढमाल, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, मामा ठाकरे, भागवत आरोटे, तानाजी पडोळ, मंदा दातीर, रत्नमाला राणे, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, हर्षदा बडगुजर, संगीता जाधव, प्रवीण तिदमे उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT