Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हेमंत गोडसे म्हणतात, आम्ही एकनाथ शिंदेंचे खासदार!

हेमंत गोडसे यांनी भाजपसाठी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या गटात.

Sampat Devgire

नाशिक : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राहून शिवसेनेच्या (Shivsena) आमदार, खासदारांना अनेक वाईट अनुभव आले होते. त्यामुळे आम्ही कंटाळलो होतो. याबाबत पहिले पाऊल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उचलले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरच आम्ही वाटचाल करणार आहोत. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असे बंडखोरीच्या वाटेवर असलेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सांगितले. (Nashik MP Hemant Godse say`s we are on Balasaheb Thakrey`s path)

राज्यात शिवसेनेत बंडखोरीचे वारे वाहत असताना, नाशिक शहराचा गड अभेद्य होता. खासदार संजय राऊत यांनी येथे मेळावा घेऊन त्याबाबत घोषणाही केली. हे सर्व घडत असताना कुठेही न दिसलेले हेमंत गोडसे अखेर शिवसेनेतून फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काल त्यांनी सुचक विधान करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललेले पाऊल योग्य आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गानेच जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. आम्ही त्याच शिवसेनेत आहोत असा दावा केला.

शिवसेनेच्या अठरा पैकी चौदा खासदार फुटल्याचे काल संकेत मिळाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर या हालचालींना वेग आला. याबाबत गोडसे म्हणाले, आम्ही बारा खासदार एकजुटीने उभे आहोत. आम्ही आमचे गटनेते म्हणून विनायक राऊत यांच्या एैवजी राहुल शेवाळे यांना करावे असे बारा सदस्यांच्या सहीचे पत्र लोकसभेच्या सभापतींना दिले आहे. त्याबाबत ते लवकरच निर्णय घेतील. आम्हाला त्याचीच प्रतीक्षा आहे.

खासदार गोडसे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा कोंडमारा होत होता. आमची पंचवीस वर्षे भाजपशी युती होती. माझ्या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. भाजपशी नैसर्गिक युती आहे, ती राहिली पाहिजे. असे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यावर मी ठाम आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्याच वाटेने पुढे जात आहोत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गाने जाऊ. आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावाही त्यांनी केला.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT