Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या सुटकेने शिवसेनेचे मनोबल वाढले

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackery) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर (sanctions Bail) झाला. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेवर नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटाचा (Shinde Group) दबाव वाढत होता. त्याला खीळ बसणार आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (NMC) इच्छुक, नेते व कार्यकर्त्यांना बळ मिळेल. त्यामुळे शहरातील पदाधिकारी उत्साहात आहेत. (Nashik Shivsena office bearers moraly strong after Raut bail)

शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले व शालिमार चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला.

नाशिकची संघटनात्मक जबाबदारी खासदार राऊत यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर जिल्ह्यातील दादा भुसे, सुहास कांदे हे दोन्ही आमदार तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी बंडखोर गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर राऊत यांनी नाशिकचा दौरा केल्यावर सर्वच माजी नगरसेवक व नेत्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

खासदार राऊत यांच्या विरोधात `ईडी`ने कारवाई केल्यावर नाशिक शहरात विस्तारासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि भाजप दोन्हींचे मनोबल वाढले होते. त्यांनी शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व माजी नगरसवेकांना आपल्या गाटत सामील करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले होते. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी विरोधक भाजप व शिंदे गटाला आक्रमकपणे उत्तर देण्याची शक्यता आहे.

हा सत्याचा विजय आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आवाज आणखी बुलंद होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या समर्थनाच्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

या वेळी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, नाना पाटील, सचिन बांडे, राजेंद्र क्षीरसागर, देवा जाधव, योगेश देशमुख, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, वीरेंद्र टिळे, प्रशांत जाधव, बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, राजाभाऊ क्षीरसागर, योगेश गाडेकर, ऋषी वर्मा, राजेंद्र नानकर, शंतनू दिंडे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT