Congress`s Ex MLA Rashid Shaikh & Mayor Tahera Shaikh
Congress`s Ex MLA Rashid Shaikh & Mayor Tahera Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काॅंग्रेसला धक्का..महापौरांसह सर्व २७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

Sampat Devgire

मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहरात काँग्रेसचे (Congress) सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) कुटुंबियांत गेले सहा महिने सुरु असलेले राजकीय नाट्य आज पूर्ण झाले. त्यांनी पत्नी व महापौर ताहेरा शेख यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आज दुपारी याबाबत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही निर्णय झालेला नाही. हे फार काळ चालण्यासारखे नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी महापौर ताहेरा शेख यांसह मालेगाव महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. श्री. शेख यांची पुत्र व माजी आमदार आसीफ शेख यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर रशीद शेख यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या दिशेने पावले टाकीत राजकीय वाटचाल सुरु केली होती. आज त्याला मूर्त स्वरूप मिळाले. या निर्णयाने मालेगाव शहरात यापुढे दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT