Shrirampur Lawyer Sanjay Kote Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Advocate death threat case : एक खून केलाय… दुसरा करायला वेळ लागणार नाही! वकिलाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून पक्षकाराचा थरार

Shrirampur Lawyer Sanjay Kote Threatened at Gunpoint; Case Filed Against Kale Father And Son : अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमधील ज्येष्ठ वकिलाला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे.

Pradeep Pendhare

Shrirampur crime news : न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीच्या वादात नातेवाईकांना मदत करतो, या संशयावरून एका ज्येष्ठ वकिलावर पिता-पुत्राने प्राणघातक हल्ला केला.

श्रीरामपूरमधील या धक्कादायक घटनेने न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने वकिलाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून ‘एक खून केला आहे, दुसरा करायला वेळ लागणार नाही’ अशी धमकी दिली. वकिलावर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण राज्यातील न्यायालयीन क्षेत्रात उमटू लागले आहे.

श्रीरामपूरमधील (Shrirampur) अ‍ॅड. संजय कोते (वय 63, रा. दत्तनगर, सुतगिरणी रोड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर विजय काळे आणि विजय यशवंत काळे (दोघे रा. सुतगिरणी रोड, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅड. कोते हे श्रीरामपूर आणि राहाता न्यायालयात (Court) गेल्या 37 वर्षांपासून वकिली करतात. त्यांच्या पत्नीचे मामा बबनराव घोरपडे यांचा एका चार गुंठे प्लॉटवरून आरोपींशी न्यायालयात वाद सुरू आहे. कोते हे घोरपडे यांना मदत करतात, असा आरोपींचा समज होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अ‍ॅड. कोते संगमनेर रस्त्यावरील एका हेअर ड्रेसरच्या दुकानातून बाहेर पडत असताना आरोपी मयूर काळे याने त्यांना गाठले.

‘त्या जागेचे मिटवायचे आहे की नाही?’ असे म्हणत आरोपीने कोते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना पाच-सहा चापटी मारून गळा दाबला व दुकानाच्या कोपऱ्यात नेले. यावेळी मयूर काळे याने आपल्या कमरेचा गावठी पिस्तूल कोते यांच्या डोक्याला लावून ‘मी एक खून केला आहे, दुसरा करायला वेळ लागणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली.

वकील वर्गात संतापाची लाट

​यावेळी गोंधळ ऐकून तिथं आलेला विजय काळे याने कोते यांच्या उजव्या पायावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. जर तू जागेच्या भांडणामध्ये आला, तर तुला जिवंत मारून टाकू, अशी धमकी दोन्ही आरोपींनी दिली. नागरिकांनी गर्दी केल्याने आरोपी तेथून पसार झाले. जखमी अ‍ॅड. कोते यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे श्रीरामपूरमधील वकील वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

वकील संघटना आक्रमक

श्रीरामपूर बार असोसिएसनचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप चोरमल यांनी, एका वकिलावर हल्ला झाल्यानंतर सायंकाळी साडेसात ते रात्री दोन वाजेपर्यंत फिर्याद घेण्यात आली नाही. वकिलावर असा प्रसंग बेतला आहे. पोलिस अशी भूमिका घेत आहे, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिसादानंतर वकील संघटना पुढील भूमिका घेईल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT