Uddhav Thackery In Jalgaon : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये चांगलच राजकारण तापलं आहे. ठाकरे गट आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलंच राजकारण तापलं होतं.
"संजय राऊतांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार'', असा इशारा राज्याचे मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही त्यांना चॅलेंज देत सभेत घुसून दाखवा, असं म्हटलं होतं. या वाक् युद्धावर आता शिवसेना ठाकरे गटात नव्यानेच सामील झालेल्या व नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुक लढवलेल्या शुभांगी पाटील यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटलांना जोरदार सुनावले आहे.
शुभांगी पाटील म्हणाल्या, "जळगावातील जल सिंचनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, वैशाली पाटील या ते आमदार होऊन सोडवतील. शिवसेना आणि महाविकास तो सोडवू शकते. गिरणा नदीवरून ठिकठिकाणी बंधारे बांधले जायला पाहिजे. पण यासाठी फक्त परवानग्याच दिल्या जातात. आम्हाला आव्हान देतात की, सभेत घुसून दाखवू. पण आम्हीच आव्हान देतो तुम्ही घुसून दाखवा," असे आव्हान त्यांनी गुलाबराव पाटलांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.