Rajabhau Waje & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar Politics : खासदार वाजेंचा गड आला पण सिंहच कसा पडला? कोकाटे-वाजेंच्या कथित सेटिंगच्या चर्चांनी राजकारण तापलं..

Sinnar Municipal Election : सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांचे सर्वांधिक १४ उमेदवार निवडून आले. पण त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा मात्र पराभव झाला.

Ganesh Sonawane

Sinnar Politics : सिन्रर नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप अशा चारही पक्षांनी आपआपले उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. नगरपालिकेची लढत चौरंगी झाली असली तरी प्रत्यक्षात खरा सामना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे व राष्ट्रवादीचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारांमध्ये रंगला.

निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांचे सर्वांधिक १४ उमेदवार निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडून आले. राजाभाऊ वाजे यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले पण त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा पराभव झाला. माणिकराव कोकाटे यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल उगले हे विजय झाले. त्यामुळे खासदार वाजे यांच्याबाबतीत गड आला पण सिंह गेला असे झाले.

सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल अशोक उगले यांनी पाच हजार ६०२ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. त्यामुळे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नगर परिषदेवर वर्चस्व सिद्ध झाले. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमोद चोथवे यांचा पराभव झाला.

शिवसेना ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या १४ जणांचे मताधिक्य पाहाता महत्वाचा म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवारच कसा काय पडला असा प्रश्न सिन्नरकरांना पडला आहे. सिन्नरच्या राजकीय वर्तुळात याबाबत वेगळीच चर्चा आहे.

माणिकराव कोकाटे व राजाभाऊ वाजे यांची नगराध्यक्षपदासाठी सेंटीग झाल्याची कथित चर्चा सिन्ररमध्ये सुरु आहे. कोकाटे व वाजे यांच्या कथित सलगीमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमोद चोथवे यांचा पराभव झाल्याच्या चर्चांनी सध्या सिन्ररच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पंरतु यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणे कठीण आहे.

नगरपालिका निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांच्या दोन उमेदवारांसाठी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली. का तर म्हणे विधानसभेला त्यांनी कोकाटेंना मदत केली होती. तिथेच कोकाटे व राजाभाऊ वाजे यांच्यातील सलगीचे दर्शन सिन्नरकरांना झाले. त्यातूनच मग नगराध्यक्षपदासाठी सलगी का झाली नसावी? असा प्रश्न उपस्थितीत होतो. या दोघांमधील सलगीमुळे प्रमोद चोथवे यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या सिन्नरमध्ये आहे.

तसेच सिन्नरमध्ये जातीय समीकरणांचाही प्रभाव दिसून आला. प्रमोद चोथवे हे वंजारी समाजाचे असल्याने बहुतांश मराठा मतदारांनी त्यांना टाळून विठ्ठल उगले हे मराठा असल्याने त्यांनाच पंसती दिली असेही बोलले जात आहे. शिंदे सेनेचे उमेदवार नामदेव लोंढे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत वाजे चौथ्या स्थानी फेकले गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT