Sinnar Election Result : सिन्रर नगपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल उगले हे ५६०२ मतांनी विजयी झाले आहेत. शेवटच्या सहाव्या फेरीत त्यांना विजयी घोषित करण्यात आले. विठ्ठल उगले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या कन्या सीमंतीनी याही रिंगणात उतरल्या होत्या. कोकाटे कुटुंबाने ही लढत प्रतिष्ठेची केली होती. त्याप्रमाणे निवडणूक जिंकली देखील.
सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाठा अशी चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे व राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा येते पणाला लागली होती. भाजप व शिवसेना गटानेही आपआपले उमेदवार देत कंबर कसली होती.
भाजपनेही शिवसेना उबाठाचे हेमंत वाजे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना नगराध्यपदाची उमेदवार दिली होती. मात्र भाजपच्या हेमंत वाजे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यपदाचे उमेदवार नामदेव लोंढे व शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. चोथवेंच्या पराभवामुळे खासदार वाजेंना मोठा धक्का बसला आहे.
माणिकराव कोकाटे यांची कोंडी करण्यासाठी सिन्नरमध्ये भाजपने जाळे टाकले होते. राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांना गळाला लावत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे यांनाही भाजपने गळाला लावत हेमंत वाजे यांच्या प्रचारात उतरवलं होतं. मात्र भाजपला माणिकराव कोकाटे यांनी धूळ चारली आहे. भाजपचे सगळे डाव कोकाटेंना हाणून पाडत आपला उमेदवार निवडून आणला.
विठ्ठल उगले यांच्या प्रचारसभेत माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर टीका केली होती. भाजप हा बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडीत भाजपचे आयुष्य चालले आहे. अशी टीका कोकाटेंनी केली होती. त्यानंतर हेमंत वाजे यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.