Prahar Office bearers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांना तात्काळ रखडलेली कर्जमाफी द्या

सिन्नर येथील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी तहसीलदारांना प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

Sampat Devgire

सिन्नर : (Sinner) यंदा अतिवृष्टीने (Heavy rain) व त्यानंतर शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे (Affected Farmers) कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेने (Prahar) केले आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात संघटना आक्रमक झाली असुन शासनाने घोषणा करूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्याची तक्रार त्यांनी केली. (Many farmers still not get benifit of loan waiver scheme)

राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याबाबत सर्व जिल्हा बँकांना राज्य शासनाने कर्जमाफीचे अनुदान वर्ग केले होते. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की यंदा राज्यभरासह तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला होता. डोळ्यांसमोर पिके पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कसेबसे वाचवलेल्या पिकांनाही बाजारभाव न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

पिकांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यास त्यांना मोठा हातभार लागेल. तसेच, तालुक्यातील माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये महिलांना अनेक ठेकेदार किमान वेतनाप्रमाणे वेतन देत नाही. त्यांची पिळवणूक होत असून सुरक्षित बेरोजगारांनाही कारखान्यांमध्ये काम मिळत नाही. या सर्व गोष्टींची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रसंगी, महिला तालुकाध्यक्ष वैशाली अनवट, युवा तालुकाध्यक्ष विलास खैरनार, सहसंपर्कप्रमुख सुनील जगताप, कार्याध्यक्ष आशा गोसावी, शेतकरी तालुकाध्यक्ष चंद्रकांत डावरे, कांचन भालेराव, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, रत्ना पवार, खंडू सांगळे, दत्तू बोडके आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT