Sinner Water Issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinner Drought Politics : वावीमध्ये पाण्यासाठी जलकुंभावर चढून उपोषण!

Sinner Villagers Aggressive on Poor Management of Drinking Water: वावी ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराविरोधात आक्रमक ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे राजकारण तापले.

Sampat Devgire

अजित देसाई

Sinner Drinking Water Issue : तालुक्यातील वावीसह (सिन्नर) अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या योजनेचे पाणी अशुध्द आहे. वेळेवेल व सुरळीत पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ येथील युवकांनी पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभावर आमरण उपोषण सुरू केले आहे. (Villagers and youth start agitation on water supply tank)

सिन्नर (Sinner) तालुक्यातील विविध भागात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा (Water) प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. त्यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे.

आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत योजनेचे पाणी सुरळीत व शुध्द येत नाही तोपर्यंत जलकुंभावरुन खाली न उतरण्याचा निर्धार केला आहे. वावीसह लगतच्या अकरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोळगावमाळ येथून योजना कार्यान्वित आहे. गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी घेऊन वावीसह अकरा गावांना पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठवड्यात कोळगावमाळ येथील तलावातील पाणी संपल्याने योजना ठप्प झाली.

या योजनेचे मिळणारे पाणी गढूळ व उग्र वास मारणारे येते. त्याचबरोबर वेळेवर पाणीपुरवठा होत नाही या निषेधार्थ वावी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक वेलजाळी, गणेश वेलजाळी, राकेश आनप, किरण संधान, विजय लांडगे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता वावी गावातील जलकुंभावर चढून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

त्यापूर्वी त्यांनी सिन्नर येथे जाऊन तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या दूषित व अनियमित पाणीपुरवठ्याची तक्रार करीत उपोषण करीत असल्याचे निवेदन दिले होते.

त्यानंतर सायंकाळी या युवकांनी योजनेच्या जलकुंभावर चढून आमरण उपोषणास प्रारंभ केला. गावातील युवक जलकुंभावर आमरण उपोषण करीत असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी जलकुंभाखाली गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत सरपंच विजय काटे, सहाय्यक पोलिस निरिक्षक चेतन लोखंडे यांचेसह ग्रामपंचायत पदाधिकारी आंदोलकर्त्यांची समजूत काढत होतो.

वावी गावामध्ये पाण्याचे जुने स्रोत उपलब्ध आहे. त्यातुन पाणीपुरवठा व्हावा. ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्वनियोजन केले नाही. पाणी पुरवण्यात अकार्यक्षम असाल तर ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे द्यावेत.- गणेश वेलजाळी (आंदोलक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT