Smita Wagh, Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Smita Wagh, Raksha Khadse : कोटीच्या कोटी उड्डाणे! स्मिता वाघ यांचा सर्वाधिक; तर रक्षा खडसेंचा खर्च किती?

Sunil Balasaheb Dhumal

Jalgaon Political News : उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात लोकसभा निवडणूक चुरसीची झाली. निवडून येण्यासाठी अनेक उमेदवारांनी पाण्यासारखा खर्च केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात जळगावमधून खासदारा झालेल्या भाजप नेत्या स्मिता वाघ यांनी जिल्ह्यात सर्वाधिक खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यांनी सुमारे पावणे आठ कोटी रूपये खर्च केला आहे.

जळगाव मतदारसंघाचे निरीक्षक कुमार चंदन आणि रावेर लोकसभा निवडणुकीचे निरीक्षक संदिपाल खान यांनी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी केली. त्यांना उमेदवारांच्या निवडणुकीतील खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी महिन्याची मुदत होती. त्यानुसार त्यांनी 4 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाचे विवरण पत्रावर शिक्कामोर्तब केले आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला, याची माहिती समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात 14 तर रावेरमधून 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांनी केलेला खर्च गुरूवारी केंद्रीय निरीक्षकांनी माहिती समोर आणली. त्यात स्मिता वाघ Smita Wagh यांनी 7 कोटी 74 लाख 2 हजार 964 रुपयांचा खर्च केल्याचे स्पष्ट झाले.

वाघ यांच्या पाठोपाठ रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आणि भाजपच्या रक्षा खडसे Raksha Khadse यांचा क्रमांक लागतो. श्रीराम पाटील यांचा 6 कोटी 42 लाख 130 तर रक्षा खडसे यांनी 6 कोटी 11 लाख 648 रुपये खर्च केल्याचे पुढे आले आहे. तसेच जळगावात वाघ यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी 5 कोटी 59 लाख 8 हजार 741 रुपये खर्च केला आहे.

जळगावमधील सर्वाधिक खर्च हा पावणे आठ कोटी असला तरी सर्वात कमी खर्च हा केवळ 200 रुपये आहे. जळगावातील एका अपक्ष उमेदवारांना फक्त 200 रुपये, तर रावेरमधून एकाने 1100 रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी अनामत म्हणून प्रत्येक उमेदवारांना 25 हजार रुपयांची रक्कम जमा करावी लागलेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT