Kangana Gen-Z Statement : भाजप खासदार कंगना राणावत यांनी 'Gen-Z'ना गटारछाप म्हटल्यावरून, अभिनेता तथा मानवतावादी समाजसेवक सोनू सूद यांनी, थेट कंगना यांना अस्तित्वाची आठवण करून देत, सूचक असे भाष्य केले आहे.
'युवा हेच एखाद्याला अभिनेता बनवतात. तुम्ही ॲक्टर असाल किंवा डॉक्टर, जनता तुमच्या सोबत आहे, तोपर्यंतच तुमचे अस्तित्व आहे,' असे सोनू सूद यांनी म्हटले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने सोनू सूद शिर्डी (Shirdi) येथे साईसमाधीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नीट पेपर फुटीप्रकरणावरून दिल्लीत जंतर-मंतरवर 'Gen-Z'ने केलेल्या आंदोलनावरून केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला जोरदार हादरा बसला आहे. या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांवरून टीका होत, तर विरोधकांकडून समर्थन होत आहे.
भाजप (BJP) खासदार कंगना राणावत यांनी 'Gen-Z'वर वादग्रस्त विधान केले आहे. 'Gen-Z' यांना गटारछाप म्हटले आहे. कंगना यांच्या या विधानावरून देशात 'Gen-Z'सह विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सत्ताधाऱ्यांनी देखील कंगना यांचे कान टोचले आहे. यातच अभिनेता तथा मानवतावादी समाजसेवक सोनू सूद यांनी कंगना यांच्या विधानावरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे.
सोनू सूद यांनी म्हटले आहे की, "मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही. जर कंगना राणावतने चुकीचे वक्तव्य केले असेल, तर ही शरमेची बाब आहे. बोलण्याआधी विचार केला पाहिजे. हेच युवा एखाद्याला अभिनेता बनवतात. त्यामुळे युवक बरोबर राहतील, तर तुम्ही राहाल. अन्यथा खूप त्रास होऊ शकतो."
तुम्ही अॅक्टर असाल किंवा डॉक्टर, जोपर्यंत जनता तुमच्याबरोबर, तोपर्यंत तुमचे अस्तित्व. जर कंगना राणावतने चुकीचे वक्तव्य केले असेल तर शर्मेची गोष्ट आहे. असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे बोलायच्या आधी विचार केला पाहिजे. कारण जनताच देवाचे रूप असते, असेही सोनू सूद यांनी म्हटले.
'Gen-Z'च्या आंदोलनावर बोलताना, युवक देशाचे भविष्य आहे. त्यांचे ऐकले पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. मात्र आंदोलन करताना मुद्दे भटकविण्यासाठी काही एलिमेंट येतात. त्यांच्यापासून वाचले पाहिजे. सावध राहिले पाहिजे. सरकार देखील देशाच्या चांगल्यासाठी काम करते. मात्र युवकांशी जोडले जाणे गरजेच, असे सोनू सूद यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.