BJP Workwers agitaion in Nashik
BJP Workwers agitaion in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पुढील कारवाई परब, मुंडे आणि संजय राऊत यांच्यावर!

Sampat Devgire

नाशिक : भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार आहे. त्यात अनिल परब, धनंजय मुंडे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई झालेली दिसेल, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिला.

आज दुपारी शहरात पक्षातर्फे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलीक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजपा कार्यालय वसंतस्मृतीच्या बाहेर निदर्शने झाली.

बॉम्बस्पोटातील ओरीपींशी आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी राष्ट्रविरोधी काम केले आहे. दुदैवाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष खोटे आरोप करून ईडी ला बदनाम करत आहे. मलिक यांच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहे. महाराष्ट्र सरकारने मलिक यांच्या बाबत आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे. हे सरकार आरोपीच्या पाठीशी आहे का? असा सवाल भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी केला.

शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. जोपर्यंत श्री. मलीक यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करीतत राहू असे श्री. पालवे यांनी स्पष्ट केले. राज्याचे मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख, नवाब मलिक येतो झाकी है, अनिल परब, धनंजय मुंडे, संजय राऊत बाकी है अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आमदार सीमा हिरे, प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, अरुण शेंदुर्णीकर, अमित घुगे, बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, सुनिल देसाई, देवदत्त जोशी, अविनाश पाटील, भास्कर घोडेकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, सुरेश पाटील, हिमगौरी आडके, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, चंद्रकांत खोडे, राकेश पाटील, प्रविण भाटे, चारुदत्त आहेर आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT