सटाणा : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत. अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आघाडी शासन कटिबद्ध असून, लवकरच आर्थिक मदत देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी आमदार दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी दिले.
बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी ते बोलत होते.
निवेदनात म्हटले आहे की, बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने अर्ली द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीयोग्य द्राक्षपीक मातीमोल झाले आहे. त्याचबरोबर हजारो हेक्टरवरील पावसाळी कांदा, मका, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांनाही अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, कंबरडेच मोडले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गारठ्यामुळे मेंढ्या, शेळ्या व इतर जनावरे मृत्युुमुखी पडल्याने शेतीसह पशुधनाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी शासनाने दिलासा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तत्काळ निर्देश द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
..
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.