Balasaheb Thorat, Agreeculture Minister
Balasaheb Thorat, Agreeculture Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गारपीटग्रस्तांना भरपाई; राज्यासाठी १२२ तर नाशिकला सर्वाधिक ५९ कोटी

Sampat Devgire

नाशिक : यंदा मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपीकांचे व फळपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत शासनाने मंजूर केली आहे. राज्यातील सहा विभागांसाठी १२२ कोटींची दिली जाणार आहे.

महसूल व वन विभागाने याबाबत जीआर काढला आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत मदत देण्यात यावी याबाबत १२ मे रोजीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यास उपसमितीने मंजुरी दिली आहे.

यामध्ये राज्यातील सहा महसूल विभागातील जिल्ह्यांना मदत उपलब्ध करण्यात येईल. मंजूर झालेल्या १२२ कोटींपैकी सर्वाधिक मदत नाशिक विभागात ५९ कोटी रुपये मंजूर झाली आहे. त्यात विभागात जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी सर्वाधिक आहे. प्रचलित नियमानुसार शेती तसेच बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना दिली जाणार आहे.

प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे मदतीचे वाटप जिल्हास्तरावर करण्यात येईल. त्यानुसार ही रक्कम बाधितांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतीच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश द्यावेत याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील महसूल विभागनिहाय जाहीर करण्यात आलेली मदत अशी, कोकण - २९.३० लाख, पुणे - ३.१६ कोटी, नाशिक - ५९.३६ कोटी, औरंगाबाद - १५.५४ कोटी, अमरावती - ३८.८७ कोटी, नागपूर - ५.०४ कोटी अशी १२२.२६ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे.

या मदतीत जिल्हानिहाय वितरित करण्यात येणारा निधी असा, कोकण विभाग : रत्नागिरी (५.१० लाख ), सिंधुदुर्ग (२४.२०), पुणे विभाग : पुणे (६४.०१), सातारा (२३.४२), सांगली (१०२.३८), सोलापूर (५७.१०), कोल्हापूर (६९.८४). नाशिक विभाग : नाशिक (११६७.२३७६), धुळे (२२६.७९८), जळगांव (३५३५.३१६४), नगर (१००६.८११). औरंगाबाद विभाग : औरंगाबाद (२५९.६९), जालना (४८६.७८), परभणी (२५.५४), हिंगोली (१४.८०), नांदेड (२०.६६), बीड (५९०.८७), लातुर (५१.४६), उस्मानाबाद (१.७४), अमरावती विभाग : अमरावती (२१०८.१४), अकोला (७८.०६), यवतमाळ (१०.८८), बुलढाणा (१०१३.०६), वाशिम (६७७.४२). नागपूर विभाग : नागपूर (२३.५४५), वर्धा (३९.२४५), भंडारा (२३६.८५८), गोंदिया (२६.८८८), चंद्रपूर (३५.७४२) आणि गडचिरोली (१३९.५३२).

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT