Dhule Maratha Agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Dhule Politics : सरकार आणखी किती बळींची वाट पाहते आहे!

Sampat Devgire

Maratha Reservation Issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला ४० दिवसांत आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले. मात्र ते पाळले नाही. सरकार आणखी किती जणांच्या बळींची वाट पाहत आहे?, अशी विचारणा सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे. (Maratha Community delegation warns political leaders in Dhule)

धुळे (Dhule) येथे मराठा समाजातर्फे (Maratha) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने (Maharashtra Government) समाजाची दिशाभूल करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने टाळाटाळ करीत वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आश्‍वासन सरकारने मुदतीत पाळलेले नाही. आरक्षणप्रश्‍नी ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत.

याबाबत सरकारने मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते. मात्र, ते दिशाभुलीचे ठरते आहे. आरक्षणप्रश्‍नी मराठा समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केली आहे. आणखी किती जणांच्या बळींची सरकार वाट पाहत आहे? आरक्षणाबाबत सरकारने लवकर खुलासा करावा, अन्यथा गुरुवार (ता.२६) नंतर जिल्हा मराठा समाज साखळी उपोषण सुरू करेल, मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाजातील बेरोजगारी व शैक्षणिक सुविधांप्रश्‍नी सरकार उदासीन दिसते. केवळ आश्‍वासने देऊन मराठा समाजाच्या भावनेशी खेळ सुरू आहे. या संदर्भात राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील. असा इशारा या वेळी दिला.

या वेळी ज्येष्ठ सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, प्रदीप जाधव, अॅड. मधुमती ठाणगे, भोला वाघ, राजू मराठे, राजू काळे, जगन ताकटे, अर्जुन पाटील, कैलास मराठे, विलास ताकटे, अशोक तोटे, कुणाल पाटोळे, वीरेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT