Vinod Tawde latest News
Vinod Tawde latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : भाजपचं ठरलं ; लोकसभा निवडणुकीत मताधिक्यांसाठी अशी असेल रणनीती

सरकारनामा ब्युरो

Vinod Tawde News : नाशिकमध्ये काल (शनिवारी) भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. भाजमधील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. पुढील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने जोरदार मोर्चबांधणी करण्यात येत आहे.

या बैठकीत प्रामुख्याने राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची व गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भारतीय जनता पक्षाकडे वळविण्याबाबत विचार मंथन केले जात असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठकीच्या निमित्ताने आलेल्या तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भाजपाला स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी प्रदेश कार्यकारणीची बैठक महत्त्वाची होत असल्याचे त्यांनी सांगितले.

"सर्व पक्षांनी २०१४ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला २८ टक्के मते पडली. शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मते पडली. मात्र, आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडील हिंदुत्ववादी मते संभ्रमित झाली आहे," असे तावडे म्हणाले.

"येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मताधिक्य २८ टक्क्यांवरून ५० टक्के वर येण्याची रणनीती भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे," अशी माहिती विनोद तावडे यांनी माध्यमांना दिली.

तावडे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावत असल्यामुळे काँग्रेस किंवा काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे जी असणारी पारंपरिकमध्ये आता भाजपकडे वळत आहेत. अशी सर्व गोळा बेरीज करून ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT