Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये 'या' प्रकरणात गुन्हा दाखल!

Case registered against Sudhakar Badgujar : अगोदरच सलीम कुत्ता प्रकरणातील आरोपांमुळे बडगुजर यांची सलग तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे.

Mayur Ratnaparkhe

Nashik News : शिवसेना(ठाकरे गट) नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या विरुद्ध आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीला कंत्राट देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत तक्रार दिली होती.

नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात सुधाकर बडगुजर(Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 2016मध्ये त्यांनी पदाचा गैरवापर करून एका कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी मागील अनेक दिवसांपासून चौकशीही सरू होती. अखेर रविवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, बडगुजर यांनी '' मला अडचणीत आणण्याचा प्रय़त्न सुरू आहे. मी या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार आहे.'' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

दरम्यान सुधाकर बडगुजर यांची रविवारी सलग तिसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. शिवाय त्यांना आणखी दोन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यांची शुक्रवारी सायंकाळी दोन तास त्यानंतर सायंकाळी साडेतीन तास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक येथे गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी चौकशी केली.

शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी नाशिक शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेतचे छायाचित्र दाखवत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन केली आहे.

तर या आरोपांवर बडगुजर यांनी पत्रकारपरिषद घेत प्रत्युत्तर दिले होते. माझा आणि सलीम कुत्ता याचा काहीही संबध नाही, असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT