Uddhav Thackeray |Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : हकालपट्टी करुन अनादर केला, माझी काय चूक झाली ते अजून कळलं नाही.. भाजपप्रवेशाआधी बडगुजर यांची खदखद

Sudhakar Badgujar's Exit from Shiv Sena: What Went Wrong? : सकाळी हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन बडगुजर हे मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

Ganesh Sonawane

Sudhakar Badgujar : स्थानिक आमदारांचा विरोध डावलून आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासह जवळपास दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हाती घेणार आहे. आज मंगळवार (दि.17) दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. त्यासाठी सकाळी हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन बडगुजर हे मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

शिवसेनेतून हकालपट्टी करुन माझा अनादर केला गेला. पण माझी काय चूक होती हे मला आजूनही समजलेलं नाही. अशी खंत बडगुजर यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले मी शिवसेनेत तब्बल 18 वर्ष काम केलं. पण तरीही माझा अनादर केला, माझी काय चूक ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न पत्रकारांनी केला असता बडगुजर म्हणाले, ज्या पक्षामध्ये आदर मिळतो त्या पक्षामध्ये जाणे कधीही उचित आहे. लवकरच महापालिका निवडणुक होणार आहे. 2017 ते 2022 हा पाच वर्षांचा कालावधी सोडला तर आता प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीत जी कामे होत आहेत, ती प्रशासनामुळे सुरू आहेत. कामे होत असताना प्रशासनावरती लोकप्रतिनीधींचा अंकूश असावा. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवून देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे असं बडगुजर म्हणाले.

बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध होता. मात्र हा विरोध झुगारुन बडगुजर यांचा भाजप प्रवेश होतो आहे. दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, अशोक मुर्तडक या दिग्गजांचाही भाजपात प्रवेश होणार आहे. यावेळी बडगुजर हे मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान एकीकडे पक्षप्रवेशासाठी बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसोबत मुंबईला निघाले असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. जोपर्यंत स्थानिक नेते, आमदार, पदाधिकारी यांचे एकमत होत नाही तोपर्यंत आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या पक्षप्रवेशावरुन संभ्रम निर्माण झाला होता. मात्र याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. ठरल्याप्रमाणे दुपारी १ वाजता मुंबईत बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT