मालेगाव : तालुक्यातील (Malegaon) बोरी- अंबेदरी धरण पाट कॅनॉलवर टाकण्यात येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या प्रस्तावीत कामास स्थगिती देण्यात यावी, यासाठी प्रकल्पबाधीत (Project Affected farmers) शेतकऱ्यांतर्फे भुषण दगडू कचवे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High court) राज्य सरकारविरुद्ध याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत योजनेचे काम सुरु करण्यात येवू नये, अशी मागणी श्री. कचवे यांनी केली आहे. Applicant deemands sta for bori-Ambedari irrigation project in High court-sd67
पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील त्यांचा हा प्रकल्प अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात लघु पाटबंधारे प्रकल्पातून बंदीस्त पाईपलाईनद्वारे काही भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याला यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. काम सुरु झाल्यावर मात्र प्रकल्पाशी संबंधीत गावांचा त्याला विरोध सुरु झाला. त्याला विरोध व पाठींबा असे चित्र आहे. झोडगे परिसरातील नागरिकांना प्रकल्प पूर्ण कारावा यासाठी दोन दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करीत महामार्ग रोखला होता. त्यामुळे मतदारसंघातील वाद आता थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
श्री. कचवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात १५ डिसेंबरला सदरची याचिका दाखल केली. सदरची बाब ही न्यायप्रविष्ट असल्याने प्रकरण निकाली निघेपर्यंत काम सुरु करु नये, अशी विनंती त्यांनी शासनास केली आहे. बोरी- अंबेदरी धरणातून बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी लाभ क्षेत्रातील शेतकरी धरण परिसरात आंदोलन करीत आहेत.
आंदोलनाला पाठिंबा दर्शवत चाळीसगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. गणेश कचवे यांनी आंदोलनस्थळी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काकाजी कचवे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात जावून आत्महत्येचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला. आता अखेर याचिका दाखल झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.