Sujay Vikhe Vs Vivek Kolhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe Vs Vivek Kolhe : 'कोणीही आलं, तर त्याचं स्वागत'; सुजयदादाचं विवेकभैय्यांना आव्हान

Pradeep Pendhare

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नगर जिल्ह्यातील कोपरगावमधील युवा नेते विवकभैय्या कोल्हे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

कोपरगाव की शिर्डी विधानसभा मतदारसंघ हे विवेक कोल्हे यांचं निश्चित नाही. परंतु यावर सावध होत, सुजयदादा विखे यांनी पहिल्यांदा विवेक कोल्हे यांना उत्तर दिलं आहे. "हे आज आम्हाला नवीन नाही. कोणीही आलं, तर त्याचं स्वागत आहे", असं सुजय विखेंनी विवेक कोल्हेंना आव्हान दिलं आहे.

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांनी एका मुलाखतीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर बोलले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखेसाहेबांच्या तयारीवर भाष्य करताना, आत्मविश्वास दाखवला. शिर्डी विधानसभेची जागा मंत्री राधाकृष्ण विखेंची आहे आणि त्यांचीच राहील. जनतेची कामं केल्यानं या मतदारसंघात राधाकृष्ण विखेंची तयारी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनताच करते. गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांना मतदारसंघात तब्बल 90 हजारांचे मताधिक्य होते. यावेळी देखील तेवढं मताधिक्य राहील, असा विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केला.

सुजय विखे म्हणाले, "कोणीही आलं, तर त्याचे स्वागत आहे. हे आज आम्हाला नवीन नाही. एका लोकसभेचा पराभव झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. गेल्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखेसाहेबांना (Radhakrishna Vikhe) 90 हजारांचे मताधिक्य होते. यावेळी तितकेच मताधिक्य असेल. जनतेमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर बोलतो". कोणाला उभं राहयचं, कोणत्या पक्षाचं चिन्हं घ्यायचं आहे, मी त्याच्याशी सलोखा ठेवत नाही, असेही सुजय विखे यांनी म्हटलं.

सुजय विखे यांनी विखे परिवाराला होत असलेल्या विरोधावर देखील भाष्य केले. विखे म्हणाले, "आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी देखील काही ठराविक लोकं आमच्यावर नाराज असायचे. आता आम्ही भाजपमध्ये आलो, आता देखील काही ठराविक लोकं नाराज असू शकतात. खासदार झालो आणि दुर्दैवाने अनेक आमदार पडले. हे खापर आमच्यावर ठेवलं. आता मीच पराभूत झालोय. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय निकाल लागतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मी आता काळजी घेतोय, कोणत्याही लोकप्रतिनिधीला बोलवल्याशिवाय जात नाही. आमचाच रोल आहे का? याच्यामध्ये हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल. पण आम्ही यात दोषी नाही आहोत. तरी आमचंच नाव घेतलं जातं, असे सुजय विखे यांनी म्हटलं.

गणेश कारखाना निवडणुकीवर भाष्य

शिर्डी विधानसभा मतदारसंघातच गणेश सहकारी कारखाना येतो. गेल्या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो, असे सांगून आम्ही पहिल्यादांच या कारखान्यात पराभूत झालेलो नाही, याकडे सुजय विखे यांनी लक्ष वेधले. यापूर्वी दोन-तीनवेळा पराभूत झालो आहोत. कारण या कारखान्याची रचना आमची नाही. त्या कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढवतात, ते देखील आमच्या विरोधात. याचं सोपं उत्तर आहे, सहकारात राजकारण न करणे! ज्या सहकारातून महाराष्ट्राचं राजकारण जन्माला आलं, त्या सहकाराला राजकारण लागू नये असे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं, याकडे सुजय विखे यांनी लक्ष वेधलं.

जमिनीवरच उत्तर देणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना सुजय विखे म्हणाले, "मी कोणाबद्दल तक्रार करत नाही. मी पराभूत झालो आहे, त्यामागे मीच जबाबदार, मी विजय झालोय, तर संघटनेचं कौशल्य! पराभवाचं खापर इतर कोणावर फोडणे हे बालिशपणा आहे". उत्तर हे जमिनीवर दिलं जातं, माझ्या पराभवाचं उत्तर देखील जमिनीवरचं देईल. तक्रार करत बसणार नाही, असे सुजय विखे यांनी ठणकावून सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT