Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe : सुजय विखेंच्या मागणीला ग्रीन सिग्नल; निष्कर्षाकडे लक्ष अन् धाकधूक वाढली

Central Election Commission approves Sujay Vikhe demand : भाजप उमेदवार सुजय विखे यांनी पराभवानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली. या पडताळणीत काय निष्कर्ष निघतो, याकडे लक्ष लागले आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला.

आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया (मॉकपोल) राबवली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कार्यवाही होईल. सुजय विखे यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीत काय निष्कर्ष येतो, याचे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नीलेश लंके यांच्या लढत झाली. विद्यमान खासदार सुजय विखे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांना हा पराभव मान्य नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विचारमंथन केल्यानंतर सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली. ही मागणी मान्य होणार, की नाही याकडे लक्ष लागले होते.

भाजपचे (BJP) सुजय विखे यांनी 4 जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर 10 जूनला मतदारसंघातील 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला. जिल्हा प्रशासनाने हा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे आणि तेथून पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या अर्जाची दखल घेत जिल्हा निवडणूक शाखेला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रक्रियेसाठी सुजय विखे यांनी सुमारे 19 लाख रुपयांचे शुल्क निवडणूक आयोगाकडे भरले आहे.

अशी होणार यंत्रणांची पडताळणी

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी सुरवातीला ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील. यानंतर आक्षेप घेतलेल्या 40 यंत्राची मेमरी रिकामी केली जाईल. शेजारीच तयार केलेल्या मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे. एका मशीनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मते टाकता येतील. किती मते करायचे हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना आहेत. ही सर्व प्रक्रिया इन कॅमेरा राबवली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT