Sujay Vikhe : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पंढरपुरात दाखल होत विठुरायाचं दर्शन घेतलं. अगदी साधेपणानं सुजय विखे वारीत सहभागी झाले. त्यांच्या या साधीपणाची वारकऱ्यांनी कौतुक केलं, तर विखेंना देखील वारकऱ्यांची विठ्ठल भक्तीची भूरळ पडली आणि त्यांनी वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढला.
सुजय विखे यांनी, 'बा विठ्ठला कृपा कर, आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे', अशी प्रार्थना करत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उमेदवार असल्याने सुजय विखे यांना प्रचारातून उसंत मिळाली नव्हती. भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. विखे यांना पराभवाला समोरं जाव लागलं. या पराभवामुळे विखेंपेक्षा त्यांचेच कार्यकर्ते अधिक खचले होते. काहींना अश्रू अनावर झाले. विखेंनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. बळ दिलं आणि कामाला लागा, अशा सूचना केल्या. यानंतर विखे यांच्या नियमित कामाला कधीच खंड पडलेला नाही. तो आजतागायत चालू आहे.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह देशभरातील विठ्ठल भक्त वारीत सहभागी झाले आहेत. भाजपचे (BJP) सुजय विखे देखील वारीत सहभागी झाले. पण अगदी साधेपणानं! त्यांनी याबाबतचा कसलाही बडेजाव केला नाही. पंढरपुरात जाताच वारकऱ्यांमध्ये सहभागी झाले. वारकऱ्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढले, तर विखेंना देखील वारकऱ्यांच्या विठ्ठल भक्तीची भुरळ पडली. विखे बराच वेळ वारकऱ्यांमध्ये रमले. भजन-कीर्तनात सहभागी झाले. विठूनामाचा जयघोष केला. वारकऱ्यांबरोबर जमिनीवर बसून जेवण घेतलं. त्यांचा हा साधेपणा अनेकांना भावला.
विठ्ठलाला राज्य दुष्काळमुक्त होवू दे, असं साकडं सुजय विखेंनी घातलं. बा विठ्ठला कृपा कर. शेतकऱ्यांना सुखी कर. राज्य दुष्काळमुक्त कर, राज्यात सर्वत्र सुख आणि समृद्धी नांदू दे, असे साकडे विखेंनी घातले. विखे परिवाराने पंढरपुरात वारकऱ्यांसाठी आश्रमात उभारला आहे. या आश्रमातील वारकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तेथील मुलभूत सुविधांची पाहणी केली. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशा सूचना तेथील सेवेकऱ्यांना दिल्या. आश्रमातील काही दुरुस्तीचे काम स्वतः विखेंनी केले, तर काही सेवेकऱ्यांकडून करून घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.