Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe News : माझी साखर काहींना कडू लागली, कसे ओळखाल...?; खासदार विखेंचा विरोधकांना टोला

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics News : भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी पुन्हा नगर जिल्ह्यातील विरोधकांना फटकारले आहे. मी दिलेली साखर काहींनी कडू लागली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा, असा सल्ला खासदार विखेंनी दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, माणिक खेडकर, अभय आव्हाड, संभाजी गर्जे यावेळी उपस्थित होते.

खासदार सुजय विखे म्हणाले, "मी दिलेली साखर जिल्ह्यातील काहींना कडू लागली. ही साखर कोणाला कडू लागली हे ओळखायचे असेल तर, ते सोपे आहे. ते लोक तुम्हाला लगेच ओळखू येतील. ते म्हणतील की, हे काय उपयोगाचे नाही. बोगसपणा चाललाय. दुष्काळ पडलाय. खासदाराला काय देणे घेणे नाही, अशी टीका करणाऱ्यांना माझी साखर कडू लागली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. कारण या लोकांचे समाजासाठी तर सोडाच, जवळच्यांसाठीही एक रुपयाचे योगदान नाही".

नगर जिल्ह्यात जे उपक्रम राबवले आहेत, ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले. आयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर उभे होऊन त्यामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार आहे. अशावेळी पूर्ण देशभरात आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. त्या दिवाळीचा आनंद गोड व्हावा, त्यासाठी आपण दिलेली साखर व डाळ यामधून प्रभू रामचंद्रासाठी प्रसाद म्हणून प्रत्येक घरातून दोन लाडू तयार करावेत, असे खासदार विखे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकाजवळ आल्या की विरोधक लोकप्रतिनिधींवर टीका करतात. मंजूर कामाविषयी आंदोलन करून राजकारण करतात, असे आमदार राजळे म्हणाल्या. अकोला गावात जिल्हा सहकारी बँकेची शाखा मंजूर करण्यासाठी आमदार राजळे यांनी व राष्ट्रीयकृत बँकेची शाखा खासदार सुजय विखे यांनी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, असे निवेदन यावेळी सरपंच नारायण पालवे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT