Sunetra Pawar NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय; नाशिकचे अधिवेशन स्थगित! छगन भुजबळ, पार्थ पवारांशीची चर्चा अन्...

NCP Camp Nashik Postpone : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, हे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.

Sampat Devgire

Sunetra Pawar News: राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नियोजन करीत होता. त्यासाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन येत्या २७ सप्टेंबरला नाशिकला होणार होते. आता हे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी राज्यातील दुष्काळ आणि पावसाने दिलेली ओढ या पार्श्वभूमीवर वेगळ्या निर्णय घेतला आहे. पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांशी या संदर्भात चर्चा केली. आणि त्यानंतर पक्षाच्या अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्याच्या 19 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारला दुष्काळाच्या प्रश्नावर घेरले होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळावर लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांच्या व शेतीच्या चिंताजनक परिस्थितीला प्राधान्य द्यावे. दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांची संवाद करावा, अशी सूचना केली आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी नाशिक विभागाची कृषी आढावा बैठक महसूल आयुक्त कार्यालयात होणार होती. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने दुष्काळाची चर्चा होणार आहे. कृषिमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री दुष्काळ दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते लातूर, सोलापूर, धाराशीव येथे पाहणी करणार असून आढावा घेणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बुलढाणा, अकोलाच्या दौऱ्यावर जात तेथील दु्ष्काळ परिस्थितीची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT