NCP Shirdi Shibir Sunil Tatkare Speeech News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचं पुढचं टार्गेट ठेवलं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, पदाधिकाऱ्यांना सर्वाधिक महापालिका जिंकण्याचं संकल्प करा, असं आवाहन केलं.
याचवेळी सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी समोर बसलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन थांबवा, अशी सूचना केली. सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना भर स्टेजवरून केलेली ही सूचना चर्चेची ठरली. मंत्री धनंजय मुंडे यांना देखील पक्ष संघटनेच्या कामातून सुटका नाही, असे देखील तटकरेंनी बजावलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(NCP) शिर्डी इथल्या नवसंकल्प शिबिरात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका किती महत्त्वाच्या आहे, यावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांत 15 पेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बहुभाषिक मुंबईत, महायुतीत सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना रुजली पाहिजे. याशिवाय राज्यातील इतर महापालिकेतील पक्षाची उत्तम कामगिरी अपेक्षित आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करत असतानाच, समोर बसलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांना उद्देशून बोलले. मुश्रीफसाहेब यांनी कागल निवडणूक कशी सूक्ष्म नियोजन करून जिंकली, याचा अनुभव शिबिरात मांडला. त्याचपद्धतीने कोल्हापूर महापालिकेसाठी नियोजन झाले पाहिजे. त्याची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांनी घ्यावी. त्याचवेळी मंत्री मुश्रीफांच्या हातात मोबाईल होता. त्यांचे लक्ष मोबाईलमध्ये असतानाच, तटकरे यांनी फोन थांबवा, अशी सूचना थेट स्टेजवरून मुश्रीफांना केली.
प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मुश्रीफांबरोबर मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना देखील 2014 ते 2019 या काळात पक्ष संघटनेत काम केलं आहे, त्याचपद्धतीने आता काम झालं पाहिजे. जरा सुद्धा सुटका नाही. आता मागे हटायचे नाही. आता पुढं जायचं. जबाबदारी आता टाळता येणार नाही, असे सांगितले.
महायुतीमधील भाजपने(BJP) सदस्य नोंदणीची मोठं टार्गेट ठेवलं आहे. परंतु आपल्याला टार्गेट नसलं, तरी 31 मार्चपर्यंत त्यांच्याबरोबरीनं सदस्य नोंदणी झाली पाहिजे. मतदार याद्या करून नोंदणी करू नका. ते आम्हाला लगेच कळते. कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात पुढं मोठी संधी आहे. पुढील वर्षे सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांनी नियमानुसार काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही सुनील तटकरे यांनी केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.