Chhagan-Bhujbal-sunil-tatkare-.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunil Tatkare Politics: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे छगन भुजबळांकडे!

Sunil Tatkare; Sunil Tatkare indicated for NCP Ajit Pawar once again everything is Chhagan Bhujbal for Nashik NMC elections-प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर सोपवला महापालिका निवडणुकीचा भार

Sampat Devgire

Sunil Tatkare News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक झाली. या बैठकीत नाशिक महापालिका निवडणुकीची चाचणी करण्यात आली. मात्र पक्षाची शहरातील स्थिती पाहता तटकरे किती समाधानी असावेत हा चर्चेचा विषय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नाशिकच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आले. यावेळी महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हाती सूत्रे सोपविण्यात आली आहेत. शहरातील राजकीय घडामोडी आणि पक्षाची स्थिती पाहता तटकरे यांच्याकडे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसावा अशी स्थिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुनिल तटकरे राज्याचा दौरा करीत आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार यानंतर त्यांनी शनिवारी नाशिकला आढावा घेतला. यावेळी राज्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर खुश आहे. येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळेल, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातील नेत्यांनी निवडणुकीसाठी प्रवेश केला आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष उपेक्षित असल्याची स्थिती आहे. याबाबत तटकरे यांनी ज्यांना सोयीचे वाटते ते त्या पक्षात प्रवेश करतात. पक्षातही अनेक नेत्यांनी व माजी आमदारांनी प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.

महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणूनच उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपचा शंभर प्लस चा दावा आणि सध्याचे आक्रमक तयारी विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सावध झाली आहे. गरज पडल्यास स्वबळावर निवडणुका लढवण्याची देखील आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सात आमदार आहेत. मात्र नाशिक शहरात या पक्षाचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी ग्राउंड रिअलिटी लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. भुजातील बळ बाहेर पडले की सर्व काही आपोआप होईल. समीर भुजबळ हे उत्तम संघटक आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चांगली कामगिरी करून दाखवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी किती प्रमाणात आणि कशाप्रकारे झाली आहे, याची प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी चाचपणी केली. या स्थितीत महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना मंत्री छगन भुजबळ यांना आपले कौशल्य आणि राजकीय वजन वापरावे लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळेच पक्षाचे नेते भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवून निर्धास्त झाल्याचे चित्र आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT