Women conducter attempt suicide
Women conducter attempt suicide Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निलंबीत कंडक्टर म्हणते, कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर, आत्महत्येशिवाय दुसरे करू काय!

Sampat Devgire

नाशिक : एसटी संपाची धग आता कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर देखील होऊ लागली आहे. निलंबीत वाहक सुकेशनी येनगंडे या महिलेने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबांची जबाबदारी आहे. निलंबीत झाल्याने आत्महत्या करावी, असेच वाटते, अजुनही दुसरे काहीच सुचत नसल्याची प्रतक्रीया या महिलेने व्यक्त केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या गेले पाच दिवस संप सुरु आहे. त्याला विविध राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने त्यात भाग घेऊन या प्रश्नाला राजकीय वळण मिळाले. त्यामुळे कामगार संघटनांनी याबाबत राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या, उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशी असल्याचे जाहीर केल्यावर मोठा पंच निर्माण झाला आहे. राज्य शासनाने याबाबत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही, अशो कठोर भूमिका घेत विविध कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याचा धडाका लावला आहे. काल यातील काही कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. या कर्माचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबणाचे पत्र देण्यात आले. त्याचा येथील सुकेशनी येनगंडे यामहिलेला जबर धक्का बसल्याचा दावा तीच्या कुटुंबियांनी केला. या महिलेने काल रात्री आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबातील सदस्यांनी तीला परावृत्त केले. मात्र त्यामुळे खळबळ उडाली.

दरम्यान या महिलेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली. त्यात तीने आपल्या अडचणी व आर्थिक विवंचणा याबाबत निवेदन केले आहे. निलंबनाची कार्यवाही झाल्याने ती बेकायदेशीर आहे. मात्र त्या विरोधात लढा कसा द्यायचा, अशी स्थिती असल्याचे पत्रात म्हटले आहे.

याबाबत पत्रकारांनी तीच्याशी संवाद साधला असता, ती म्हणाली, माझे आई-वडील नाहीत. लहान बहिण आहे. तीची जबाबदारी देखील माझ्यावरच आहे. अशा स्थितीत तीन महिने पगार न मिळाल्यास काय करावे. घरभाडे, वीजेचे बील कसे भरणार या विचाराने मी निराश झाले होते. मला बारा हजार रुपये वेतन मिळते. अशा स्थितीत दुसरे काहीच सुचत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीला पारवृत्त करून नागरिकांनी समजावून सांगितल्यावर देखील तीने मला अद्यापही आत्महत्या करावी असे वाटते, अशी प्रतिक्रीया तीने व्यक्त केली.

दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या संपाचा आज नाशिक भागात पाचवा दिवस आहे. यासंदर्भात बुधवारी ३३ तर गुरुवारी सत्तावन्न कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. आज पुन्हा दहा जणांना निलंबीत केले आहे. या स्थितीत संप मिटवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. अशी स्थितीत या संपाची तीव्रता कर्माचारी, शासन आणि प्रवासी अशा तिन्ही स्तरावर गंभीर होत आहे. या संपातून काय तोडगा काढायचा याचा निश्चित विचार व दिशा सापडलेली नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT