MLA Saroj Ahire & Rajshree Ahirraon
MLA Saroj Ahire & Rajshree Ahirraon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire News: अमेरिकावारी करणाऱ्या तहसीलदार अहिरराव यांच्यावर गंभीर आरोप!

Sampat Devgire

नाशिक : येथील (Nashik) राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) या तहसीलदारपदी कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. शासकीय (Maharashtra) पगार घेऊन त्या विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. पदाच्या माध्यमातून त्यांनी जनतेची अनेक कामे रोखण्यासाठी त्या आपल्या अधिक्षक अभियंता भगिनीचा उपयोग करतात, असा गंभीर आरोप आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी केला आहे. (MLA Saroj Ahire deemands action against Tahsildar Rajshree Ahirrao)

यासंदर्भात आज आमदार अहिरे यांनी मतदारसंघातील विविध शेतकरी, सरपंचांसह पत्रकार परिषद घेतली. याबाबत त्यांनी पाच पानांचे एक निवेदन पत्रकारांना दिले. त्यात तहसीलदार अहिरराव आणि अधिक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी मिळून अनेक लोकोपयोगी कामांना पदाचा दुरुपयोग करून स्थगिती दिली. त्यामुळे नागरिकांना अत्यंत गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागले, यांसह विविध गंभीर आरोप केले आहेत.

यानिमित्ताने आमदार विरूद्ध वादग्रस्त तहसीलदार अहिरराव यांच्यात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी तहसीलदार राजश्री अहिरराव आणि त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या कारभाराचा पाढाच वाचला. त्यात अनेक गंभीर गैरप्रकारांचा समावेष आहे. अशा बेलगाम आणि पदाचा दुरुपयोग करून, शासकीय पगार घेऊन व्यक्तीगत राजकीय अजेंडा राबविणाऱ्या अहिरराव यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे इशारा आमदार अहिरे यांनी दिला.

आमदार अहिरे म्हणाल्या, जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव या आपल्या बहिणीची राजकीय स्वप्नपूर्ती होण्यासाठी कामकाज करीत आहेत. उपद्रवी तहसीलदार यांनी आपल्या अपप्रचार करून स्वतःचा पब्लिसिटी स्टंट बंद करावा.

देवळाली मतदार संघातील अनेक कामांमध्ये तहसीलदार राजश्री अहिरराव मोडता घालण्याचे काम करीत आहेत. मात्र जनता माझ्या पाठीशी असून लोकांना सत्य कळाले आहे. म्हणून तहसीलदार राजश्री आहेरराव यांच्यावर मी मार्च महिन्यात हक्कभंग दाखल करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT