Shivsena womens front
Shivsena womens front Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कंगनाचा पुरस्कार परत घ्या, अन्यथा शिवसेनेचा झटका देऊ!

Sampat Devgire

मालेगाव : आपल्याला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, असे कंगना राणावत बोलली. हा संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा अवमान आहे. कंगणा राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने तातडीने रद्द करावा. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे.

शिवसेना महिला आघाडीने कंगनाचा निषेध केला. जिल्हा संघटक संगीता चव्हाण, शहर संघटक छाया शेवाळे, नगरसेविका आशा अहिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो वीरांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. भारतमातेच्या वीरांनी बलिदान देऊन मिळालेल्या स्वातंत्र्याला भिक म्हणणे हे देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे.

स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे यासारख्या महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यासारख्या महापुरुषांचाही घोर अपमान आहे. या सर्वांनी काय भिकेसाठी आपले प्राण अर्पण केले. कदाचित या माथेफिरू महिलाला मिळालेले पुरस्कार भिकेत मिळाले असावेत, म्हणूनच तिने अत्युच्च त्यागाने व बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हटले असावे. निवेदनात कंगणा राणावत रोज नवनवीन शोध लावते. तिला या ऐतिहासिक संशोधनाबद्दल केंद्र सरकारने भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी उपाहासात्मक टीका केली आहे.

शिष्टमंडळात उपशहर संघटक अरुणाताई चौधरी, गटप्रमुख मनीषा अहिरे, शाखाप्रमुख आयशा शेख, सुमन देवरे, शोभा शेलार, अंजल कायस्थ, अश्‍विनी विचारे, वैशाली निकम, शकिलाबानो अहमद, साकेराबानो आदी महिलांचा समावेश होता.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT